मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बुलेटला 'बॅलेट'ने उत्तर, 10 किमी पायपीट करून केले मतदान!

बुलेटला 'बॅलेट'ने उत्तर, 10 किमी पायपीट करून केले मतदान!

कडक सुरक्षा बंदोबस्तामुळे कुठलीही घटना घडली नाही. मतदानाची दुपारी दीडपर्यंतची आकडे सत्तर टक्के होती.

कडक सुरक्षा बंदोबस्तामुळे कुठलीही घटना घडली नाही. मतदानाची दुपारी दीडपर्यंतची आकडे सत्तर टक्के होती.

कडक सुरक्षा बंदोबस्तामुळे कुठलीही घटना घडली नाही. मतदानाची दुपारी दीडपर्यंतची आकडे सत्तर टक्के होती.

गडचिरोली, 15 जानेवारी : राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. भिवंडी, दौंड आणि सोलापूरमध्ये मतदान केंद्राजवळ हाणामारीच्या घटना घडल्या आहे. तर  मागास भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी मतदारांनी पाच ते दहा किलोमीटर पायी चालत जाऊन मतदान करुन दहशत झुगारुन बॅलेटला पसंती दिली.

माओवादप्रभावीत  गडचिरोली जिल्ह्यात आज पहिल्या टप्प्यात 170 ग्राम पंचायतीसाठी मतदान झालं. राज्यात मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यात माओवाद्यांची दहशत असतानाही आदिवासी मतदारांनी तब्बल पाच ते दहा किलोमीटर पायी चालत जाऊन मतदान करुन बॅलेटला पसंती दिली.

कडक सुरक्षा बंदोबस्तामुळे कुठलीही घटना घडली नाही. मतदानाची दुपारी दीडपर्यंतची आकडे सत्तर टक्के होती. ही टक्केवारी सरासरी 85 टक्के होण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यात मतदानावरून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक

तर सोलापूर जिल्ह्यात मतदानावरून दोन गटांमध्ये एकमेकांना तुफान दगडफेक करण्यात आली. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा गावात मतदानावरुन दोन गटात वाद झाला होता.  गावातील भोसले आणि भिंगारे गटात मतदान केंद्राच्याजवळ मतदानाच्या मुद्यावरून वाद उफाळला होता. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद पेटला होता. बाचाबाचीचे रुपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत  दोन्ही गटाचे तीन ते चार कार्यकर्ते जखमी झाले आहे. जखमी कार्यकर्त्यांवर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करण्यात आले.  या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दौंडमध्ये कुसेगाव मतदान केंद्रावर राडा

दौंड तालुक्यामध्ये 48 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळी सुरुवात झाली. कुसेगाव येथील मतदान केंद्राच्या परिसरात दोन गटामध्ये अचानक वाद पेटला. तुफान हमरा-तुमरीचे रूपांतर भांडणात झाले आहे. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने दोन गटातील बाचाबाची थांबली.

मात्र, हा सगळा प्रकार मतदान केंद्राच्या आवारात झाला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवला गेला होता. मात्र, याला कुठे तरी तडा गेल्याचे दिसून आले. सध्या कुसेगाव येथे सुरुळीत मतदान सुरू असले तरी भांडणानंतर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तणावाचे वातावरण झाले होते. अद्याप या प्रकरणाचे कारण समजू शकले नाही.

First published:

Tags: Gram panchayat, गडचिरोली