मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सर्वात आधी शिवसेनेनं उधळला विजयाचा गुलाल, ग्रामपंचायतीवर फडकावला भगवा!

सर्वात आधी शिवसेनेनं उधळला विजयाचा गुलाल, ग्रामपंचायतीवर फडकावला भगवा!

 विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  पण, निवडणुकीचा निकाला लागण्याआधीच शिवसेनेनं खातं उघडले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पण, निवडणुकीचा निकाला लागण्याआधीच शिवसेनेनं खातं उघडले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पण, निवडणुकीचा निकाला लागण्याआधीच शिवसेनेनं खातं उघडले आहे.

धुळे, 30 डिसेंबर : लॉकडाउनमुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा (gram panchayat election 2021) धुरळा आता उडाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  पण, निवडणुकीचा निकाला लागण्याआधीच शिवसेनेनं (Shivsena) खातं उघडले आहे. धुळ्यातील (Dhule) जिल्ह्यातील वडदे ही पहिली ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून शिवसेनेनं भगवा फडकावला आहे. राज्यात 14 हजार 232 ग्राम पंचायतीच्या निवडणुका होत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे  निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी मागणी पुढे येत आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वडदे गावात ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.  वडदे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली वडदे ग्रामपंचायतीवर बिनविरोध भगवा फडकावला आहे.  परंतु, आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अजूनही अर्ज भरण्याची छाननी सुरू आहे. मात्र, शिवसेनेनं हा निवडणूक बिनविरोध झाल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सुनिता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तालुक्यातील वडदे  ग्रामपंचायत बिनविरोध करून दाखवली.  सिमा देवेसिंग भिल, कविता दिनेश चित्ते, शुभांगी सुनिल चित्ते, माधुरी किशोर कोळी, राजेंद्र बन्सिलाल मगरे, विजय अशोक चित्ते, प्रविण किसन चित्ते यांची ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवड करुन शिवसेनेचा भगवा फडकवून गेल्या 45 वर्षाची परंपरा वडदे गावकऱ्यांनी कायम ठेवली. शिंदखेडा शहर प्रमुख सागर देसले आणि माजी शहर प्रमुख नंदकिशोर पाटील यांच्यासह वडदे गावातील  पांडुरंग चित्ते,दयाराम चित्ते, ज्ञानेश्वर बागुल,निंबा सौंदाणे, संभाजी चित्ते  यांच्यासह गावकऱ्यांनी एकत्र येऊन  गावाचे नाव शिंदखेडा तालुक्यात नावलौकिक केले. वडदे येथील गावकऱ्यांनी शिंदखेडा तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे. शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी धावपळ दरम्यान, बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी सकाळपासूनच जिल्हाभरातील तहसील कार्यालयांमध्ये गर्दी केली होती. जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. आज दुपारपर्यंत केज येथे 255 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते तर आष्टी येथे शंभरपेक्षा जास्त अर्ज आले होते. बीड तालुक्यातील 29 ग्रा.पंचायतीसाठी कालपर्यंत 230 अर्ज आलेले होते. जिल्हाभरातील एकूण अर्जांची संख्या हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. उद्या आणि परवा दोन दिवस अर्जाची छाननी होणार आहे. एकही ग्राम पंचायत अद्यापपर्यंत बिनविरोध निघालेली नव्हती.
First published:

पुढील बातम्या