मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धुळ्यानंतर रायगडमध्ये शिवसेनेनं उधळला विजयाचा गुलाल, ग्रामपंचायतीवर भगवा झेंडा!

धुळ्यानंतर रायगडमध्ये शिवसेनेनं उधळला विजयाचा गुलाल, ग्रामपंचायतीवर भगवा झेंडा!

खानवळे येथून 9 जण  सदस्यपदासाठी उभे राहिले. त्यापैकी 6 जण हे बिनविरोध निवडून आले आहे. यात शिवसेनेचे 5 सदस्यांचा समावेश आहे.

खानवळे येथून 9 जण सदस्यपदासाठी उभे राहिले. त्यापैकी 6 जण हे बिनविरोध निवडून आले आहे. यात शिवसेनेचे 5 सदस्यांचा समावेश आहे.

खानवळे येथून 9 जण सदस्यपदासाठी उभे राहिले. त्यापैकी 6 जण हे बिनविरोध निवडून आले आहे. यात शिवसेनेचे 5 सदस्यांचा समावेश आहे.

    रायगड, 31 डिसेंबर : राज्यात 14 हजार ग्रामपंचायत निवडणुकीच्या (gram panchayat election 2021) प्रचाराला धुरळा उडला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु, शिवसेनेनं (Shivsena) सर्वात आधी बाजी मारली आहे. शिवसेनेनं धुळे पाठोपाठ रायगडमध्येही (Raigad) ग्रामपंचायतीवर भगवा फडकावला असून विजयाचा गुलाला उधळला आहे. रायगड  जिल्ह्यातील खानावळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Khanawale Gram Panchayat Election) अर्ज भरण्यात आले आहे. परंतु,  9 पैकी शिवसेनेचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे, त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात आहे, असं वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिलेले आहे. '2020 मध्ये तू होतास रे पण आता....' इरफान खानच्या पत्नीची भावुक पोस्ट खानावळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पनवेल तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींच्या निवडणूक होणार आहे. त्यापैकी खानवळे येथून 9 जण  सदस्यपदासाठी उभे राहिले. त्यापैकी 6 जण हे बिनविरोध निवडून आले आहे. यात शिवसेनेचे 5 सदस्यांचा समावेश आहे. तसंच एक अपक्ष सदस्य सुद्धा बिनविरोध निवडून आला आहे. 9 पैकी निम्मे सदस्य निवडून आल्यामुळे शिवसेनेचं पारडे जड झाले आहे. औरंगाबादच्या नामकरणाला काँग्रेसचा विरोध, महाविकास आघाडीत वाद पेटणार? उर्वरीत 3 जागांसाठी आता निवडणूक लढवली जाणार आहे. शिवसेनेचे जास्त सदस्य बिनविरोध निवडून आल्यामुळे शिवसेनेचा विजय हा निश्चित मानला जात आहे. याची अधिकृत घोषणा ही निवडणूक निकालानंतर होणार आहे. पण त्याआधीच शिवसैनिकांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण तालुक्यांमध्ये शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील यांनी सेनेच्या विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यांच्या या मेहनतीला ग्रामपंचायत निवडणुकीत यश हाती आले आहे. धुळ्यात ग्रामपंचायतीवर सेनेनं फडकावला भगवा दरम्यान, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वडदे गावात ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.  वडदे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली वडदे ग्रामपंचायतीवर बिनविरोध भगवा फडकावला आहे. नव्या वर्षाचा फस्ट डे फर्स्ट शो, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर! शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सुनिता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तालुक्यातील वडदे  ग्रामपंचायत बिनविरोध करून दाखवली.  सिमा देवेसिंग भिल, कविता दिनेश चित्ते, शुभांगी सुनिल चित्ते, माधुरी किशोर कोळी, राजेंद्र बन्सिलाल मगरे, विजय अशोक चित्ते, प्रविण किसन चित्ते यांची ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवड करुन शिवसेनेचा भगवा फडकवून गेल्या 45 वर्षाची परंपरा वडदे गावकऱ्यांनी कायम ठेवली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या