मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Gram Panchayat Election 2021: EVM मशीनमधून उमेदवाराचेच नाव गायब, मनमाडमध्ये खळबळ

Gram Panchayat Election 2021: EVM मशीनमधून उमेदवाराचेच नाव गायब, मनमाडमध्ये खळबळ

मनमाडच्या पानेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सकाळी सुरुवात झाली.

मनमाडच्या पानेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सकाळी सुरुवात झाली.

मनमाडच्या पानेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सकाळी सुरुवात झाली.

मनमाड, 15 जानेवारी : राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat Election 2021) मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. ठिकठिकाणी गाव खेड्यात मतदान करण्यास लगबग सुरू झाली आहे. तर दुसरीकडे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मनमाडमध्ये (Manmad) ईव्हीएम मशीनमधून (EVM machine ) उमेदवाराचे नावच गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

मनमाडच्या पानेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सकाळी सुरुवात झाली. पण ईव्हीएम मशीनवरुन उमेदवारांचे नावच गायब झाल्याचे दिसून आले. वॉर्ड नंबर 2 मधील उमेदवाराचे नाव गायब ईव्हीएम मशीनमधून गायब झाले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने  वॉर्ड 2 मधील मतदान प्रक्रिया थांबली. घडलेल्या या प्रकारानंतर प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल  झाले आहे.  ईव्हीएम मशीन दुरुस्तीचे काम सुरू आहे.

परभणीमध्ये मिळतंय सर्वात महाग पेट्रोल, वाचा काय आहे कारण

तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील सडोली खालसा येथे ईव्हीएम यंत्र बंद पडले आहे.  प्रभाग क्रमांक 2 चे ईव्हीम मशीन बंद झाले आहे. मशीनची चाचणी घेताना सिग्नल न आल्याने प्रकार लक्षात आला.

कवी यशवंत मनोहर यांनी 'जीवनव्रती पुरस्कार' नाकारला, सरस्वती प्रतिमेला विरोध

दरम्यान, राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होतंय. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून ग्रामीण भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे. राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका या राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जात नाहीत. यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे समजत नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून आम्हीच जास्त जागा जिंकल्या, असा दावा केला जातो. तसेच राजकीय पाया भक्कम करण्यासाठी सर्वच राजकीय नेते आपापल्या भागांमधील निवडणुकांमध्ये लक्ष घालतात. खासदारकी आणि आमदारकीसाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात असणे राजकीय नेत्यांसाठी आवश्यक असते. त्यामुळे या वेळीही सर्वच नेत्यांनी आपापल्या भागांमधील निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.

First published: