Home /News /maharashtra /

‘दुभंगलेली मनं पुन्हा कधीही जुळून येत नाहीत’ उदयनराजेंची गावकऱ्यांना भावनिक साद

‘दुभंगलेली मनं पुन्हा कधीही जुळून येत नाहीत’ उदयनराजेंची गावकऱ्यांना भावनिक साद

'ग्रामपंचायती या ग्रामविकासाचा पाया समजल्या जातात. मी मोठा की तू मोठा असे म्हणत निवडणुकांदरम्यान घमासान घडून धुमश्‍चक्री उडते. प्रसंगी संपूर्ण गावास वेठीस धरले जाते'

    सातारा, 16 डिसेंबर :  लॉकडाउनमुळे लांबलेल्या 14234 ग्रामपंचायत निवडणुकीचा (Gram Panchayat election) कार्यक्रम आता जाहीर झाले आहे. त्यामुळे गावखेड्यांवर राजकीय नेत्यांची गर्दी सुरू झाली आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी ग्रामपंचायती निवडणुकीच्या निमित्ताने साद घातली आहे. उदयनराजे भोसले यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.  'येत्या 15 जानेवारीला जिल्ह्यातील तब्बल 900 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. प्रत्येक गावाने आपल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे. अशा गावांना राज्यातून आणि विशेषकरुन केंद्रातून लोकसंख्येनुसार विशेष निधी उभा करुन विकासात्मक प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहे' असं आश्वासनच उदयनराजे यांनी दिले आहे. 'कोरोनाच्या संसर्गामुळे गेले 9-10 महिने शेतकर्‍यांसह संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच अनेकांना प्राणासही मुकावे लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणुका आल्यामुळे प्रथेप्रमाणे गावागावांत भांडणतंटे, ईर्ष्या, चढाओढ पहायला मिळणार आहे. त्यामुळे कोविड विरोधात लढणारे पोलीस, लोक प्रशासन, वैद्यकीय आरोग्य कर्मचार्‍यांवर फार मोठ्या प्रमाणात ताण वाढणार आहे. हे टाळायचे असेल तर प्रत्येक गावाने आपल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे. अशा गावांना राज्यातून आणि विशेषकरुन केंद्रातून लोकसंख्येनुसार, विशेष निधी उभा करुन विकासात्मक प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहे', असं आवाहन उदयनराजे यांनी केले आहे. 'काय होतास...' माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा VIDEO व्हायरल 'ग्रामपंचायती या ग्रामविकासाचा पाया समजल्या जातात, तर ग्रामपंचायत निवडणुकी या लोकशाहीचा पाया समजल्या जातात. आजदेखील राज्यातील विविध गावांमध्ये निवडणुका सोडल्या तर अन्य बाबतीत गट-तट बाजूला ठेवून यात्रा-जत्रा आणि गावाच्या सर्वांगिण विकासाचे उपक्रम राबविले जातात. ग्रामीण भागातील कष्टकरी व शेतकरी वर्गामुळे अजूनही माणुसकी टिकून आहे. तथापि कोणत्याही निवडणुका आल्या की, विशेषत: ग्रामीण भागात ईर्ष्या, चढाओढ, मी मोठा की तू मोठा असे म्हणत निवडणुकांदरम्यान घमासान घडून धुमश्‍चक्री उडते. प्रसंगी संपूर्ण गावास वेठीस धरले जाते. निवडणुकांमध्ये दुभंगलेली मने पुन्हा कधीही जुळून येत नाहीत. त्यामुळे भावकी गावकीत पिढ्यांपिढ्या संघर्ष सुरू राहतो. त्यामुळे गावच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर खीळ बसतेच. परंतु, त्यापेक्षाही गावातील निकोप वातावरण गढूळ होते, याची प्रचिती गेली काही दशके संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतोय, अशी चिंताही उदयनराजेंनी व्यक्त केली. नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या अभिनेत्याच्या क्राईम ब्राँचने आवळल्या मुसक्या 'ग्रामपंचायत निवडणुका गावपातळीवर असल्याने त्याच्या धुरळ्याने प्रत्येक गावातील घरटी उडणार आहेत. आधीच कोरोनाचा संसर्ग, त्यात निवडणुकांचा विसर्ग. त्यामुळे गावांत कोरोना संसर्गाची भीतीही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्या अनुषंगाने हेवे-दावे विरहित, ग्रामस्थांच्या वैचारिक सहकार्यातून बिनविरोध निवडणुका झाल्यास त्याचे चांगले दूरगामी परिणाम दिसणार आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावच्या एकीद्वारे घेण्यात आलेल्या निवडणुका म्हणजे ‘गाव करील, ते राव काय करील’ ही म्हण सार्थ ठरवणार्‍या असणार आहेत. संपूर्ण देशाला नवी दिशा देणार्‍या या निवडणुका ठरणार आहेत. त्यामुळे हेवे-दावे विरहित, बिनविरोध निवडणुका विविध गावांतील ग्रामस्थांनी घ्याव्यात, असंही उदयनराजे म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: उदयनराजे भोसले, सातारा

    पुढील बातम्या