Home /News /maharashtra /

Gram panchayat election : शिवसेनेचे 19 पैकी 17 उमेदवार बाद, राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग सुसाट!

Gram panchayat election : शिवसेनेचे 19 पैकी 17 उमेदवार बाद, राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग सुसाट!

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या बलसूर गावात हा प्रकार समोर आला आहे.

उस्मानाबाद, 04 जानेवारी : राज्यात ग्रामपंचायत (Gram panchayat election 2021) निवडणुकीचे बिगुल वाजताच गावातील गाव पुढाऱ्यांनी तयारीला सुरुवात केली आहे मात्र, जिल्ह्यातील बलसुर येथे वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या (Shivsena) पॅनलचे 19 पैकी 17 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची (NCP) एकहाती सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर सेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या बलसूर गावात हा प्रकार समोर आला आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटच दिवस आहे. त्याच दरम्यान, शिवसेनेच्या पॅनलच्या 19 पैकी 17 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गटाची  तारांबळ उडाली आहे. त्यामुळे विरोधकांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. बलसूर येथील पाच प्रभागात पंधरा उमेदवारांसाठी निवडणूक होणार होती. या पंधरा जागेसाठी एकूण 43 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 17 नामनिर्देशन पत्र अवैध ठरल्याने फक्त 26 नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. उमेदवारी अर्जावर अनुक्रमांक व प्रभाग क्रमांक चुकीचा देणे, साक्षीदार सही घेतली नसल्याचे कारण देत, त्याचबरोबर अपत्य स्वयंघोषणापत्र नसणे, अशिक्षित असल्याचे शपथपत्र न देणे, ठेकेदारी करत नसल्याचे स्वयंघोषणापत्र नसणे, परिशिष्ट दोनची नोटरी नसल्याच्या कारणावरून उमेदवारी अर्ज बाद ठरविले आहेत. हे 17 अवैध ठरलेले नामनिर्देशन पत्र बब्रुवान चव्हाण व सुरेश मुझे यांच्या गटाचे होते. हे दोन्ही गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या विरोधी गट मानले जातात.  त्यामुळे बिराजदार यांच्या गटाचा मार्ग सुकर झाला आहे. दरम्यान, राज्यात एकत्र सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी व शिवसेनेच्या गटात च गोंधळ झाला असून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाच्या गावातच हा प्रकार झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना युतीवर  काही परिणाम होतो का हे पाहावे लागणार आहे. सरपंचपदाच्या लिलावासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दरम्यान, सरपंचपदाच्या लिलावांबाबत होत असलेल्या तक्रारींसंदर्भात राज्य निवडणूक आयोगास स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. मदान यांनी सांगितले की, 'सरपंचपदाचा लिलाव होत असून त्यासाठी मोठ्या रकमेची बोली लावण्यात येत आहे, अशी तक्रार आयोगाकडे आली आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने ही बाब गंभीर आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात अशा स्वरूपाच्या घटना घडल्या असल्यास त्यांची सखोल चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करावा. हा अहवाल बिनविरोध विजयी होणाऱ्या उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यासाठी 23 डिसेंबर 2004 च्या आदेशानुसार आयोगाकडे परवानगी मागतानाच सादर करावा.'
Published by:sachin Salve
First published:

Tags: NCP, Osmanabad, Shivsena, राष्ट्रवादी, शिवसेना

पुढील बातम्या