Gram Panchayat Results : पृथ्वीराज चव्हाणांना धक्का, भाजपने उडवला धुव्वा

Gram Panchayat Results : पृथ्वीराज चव्हाणांना धक्का, भाजपने उडवला धुव्वा

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये (Gram Panchayat Election Results) काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना जोरदार धक्का बसला आहे.

  • Share this:

कराड, 18 जानेवारी : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये (Gram Panchayat Election Results) काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना जोरदार धक्का बसला आहे. कराडमध्ये काँग्रेस (Congress) नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला अपयश, कराडच्या काले ग्रामपंचायतीत भाजपच्या (BJP) पॅनलला 14 जागा, तर पृथ्वीराज चव्हाण गटाला 3 जागा मिळाल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींमधील 123 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या, तर 98 ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाल्या. त्यामुळे 652 ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले असून 9521उमेदवार रिंगणात उतरले होते.

Gram Panchayat Results : शिवसेना-काँग्रेसने उलथवली राष्ट्रवादीची सत्ता

दुसरीकडे कराड ग्रामपंचायतीमध्ये मात्र सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने विरोधकांचा 8-1 ने धुव्वा उडवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी साताऱ्यातून पहिली गुड न्यूज आल्याचं दिसत आहे.

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले. या निवडणुकींचे निकाल यायला सुरूवात झाली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये मतदान केंद्रावर मतांची मोजणी सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मात्र 22 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

Published by: Shreyas
First published: January 18, 2021, 11:06 AM IST
Tags:

ताज्या बातम्या