पंढरपुरात महाविकास आघाडी धक्का, भाजप उमेदवाराला 'या' संघाने दिला पाठिंबा

मुख्याध्यापक महा मंडळाची आज पंढरपूरमध्ये बैठक पार पडली. यावेळी भाजप उमेदवार जितेंद्र पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

मुख्याध्यापक महा मंडळाची आज पंढरपूरमध्ये बैठक पार पडली. यावेळी भाजप उमेदवार जितेंद्र पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

  • Share this:
पंढरपूर,19 नोव्हेंबर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवणडणुकीत (graduate and teacher legislative council elections) अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रचाराचा धुरळा उडाला आहे. पंढरपूरमध्ये महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. मुख्याध्यापक महामंडळाने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्याध्यापक महा मंडळाची आज पंढरपूरमध्ये बैठक पार पडली. यावेळी भाजप उमेदवार जितेंद्र पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.  महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने यांच्या उपस्थितीत भटुंबरे इथं सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक महामंडळाची बैठक पार पडली. मुंबई महापालिका निवडणूक लढविण्यावरून काँग्रेस नेत्यांमधले मतभेद उघड मागील सहा वर्षात विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांनी शैक्षणिक क्षेत्रात ठोस कोणतेही काम केले नाही. त्यांनी कोणत्याही कामात लक्ष दिले नाही. शिक्षकांचा त्यांनी विश्वासघात केला आहे, अशी टीका यावेळी सुभाष माने यांनी केली. मुख्याध्यापक महामंडळाने भाजप उमेदवार जितेंद्र पवार यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे. ठिकठिकाणी प्रचारात आघाडी घेतली आहे. एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी तातडीनं मुंबईकडे रवाना विशेष म्हणजे, बुधवारी राज्य कृती शाळा समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेस उमेदवार जयंत आसगावकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे पंढरपूरमधील वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर आज मुख्याध्यापक महामंडळाने भाजप उमेदवाराला पाठिंबा देऊन आणखी चुरस वाढवली आहे. औरंगाबादमध्ये भाजपला बंडखोरीचा फटका दरम्यान,  माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीडमध्ये भाजपला आणखी धक्का बसला आहे. माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी 18 नोव्हेंबर रोजी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एवढंच नाहीतर गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. कराची स्वीट्ससाठी राऊत मनसेविरोधात मैदानात, म्हणाले, 'नाव बदलाची मागणी निरर्थक' पदवीधर निवडणुकीसाठी भाजपाकडून जयसिंग गायकवाड इच्छुक होते. पण, उमेदवारी न मिळाल्यामुळे जयसिंग गायकवाड कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळेच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारी केली आहे. त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 'पक्षात माझ्याकडे काहीच जबाबदारी नव्हती. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्याकडे दुर्लक्ष केले होते. मी पक्षाकडे वारंवार काही तरी काम मागितले, पण कुणीची प्रतिसाद दिला नाही. माझ्याकडे कुणीच लक्ष देत नसेल तर तिथं कशाला राहायचं अस सवाल  जयसिंगराव गायकवाड यांनी केला.
Published by:sachin Salve
First published: