सांगली, 13 ऑक्टोबर: वडिलांच्या मृत्यूनंतर शेतजमिनीत हिस्सेदारी घेऊन आईला वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलींना नागरिक निर्वाह न्यायाधिकरणानं दणका दिला आहे. दोन्ही मुलींनी आपल्या जन्मदात्या आईला पाच हजार रुपयांची पोटगी द्यावी, असा आदेश न्यायाधिकरणानं दिला आहे. न्यायाधिकरणाच्या या आदेशानंतर हवालदिल झालेल्या मातेला आधार मिळाला आहे. संबंधित घटना सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील वायफळ येथील आहे.
रखमाबाई चव्हाण असं 60 वर्षीय वृद्ध मातेचं नाव आहे. त्या जत तालुक्यातील वायफळ येथील रहिवासी आहेत. 1999 साली रखमाबाई यांच्या पतीचं निधन झालं होतं. पतीच्या निधनानंतर, लेकींनी शेतजमित आपापली हिस्सेदारी घेतली होती. यानंतर दोघींनीही आपल्या आईला वाऱ्यावर सोडलं होतं. त्यांनी आपल्या जन्मदात्या आईचा सांभाळ करण्यास नकार दिला.
हेही वाचा-बदनामी टाळण्यासाठी गॅलरीत लपायला गेली अन्...; इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू
मुलींच्या या निर्णयामुळे निराधार झालेल्या रखमाबाई यांच्या दु:खाचा डोंगर कोसळला. हवालदिल झालेल्या रखमाबाई आपल्या माहेरी जाऊन राहू लागल्या. यानंतर त्यांनी अखेर 6 जानेवारी 2021 रोजी जत पोलीस ठाण्यात आपल्या लेकींविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच रखमाबाई यांनी आपली तक्रार घेऊन प्रातांधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
हेही वाचा-खोटेपणा उघड झाला अन् बीएमसीतील नोकरी गेली; बुलडाण्यात तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
या प्रकरणाची सुनावणी करत असताना, जत प्रांताधिकारी तथा जेष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाचे अधिकारी प्रशांत आवडे यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. या आदेशान्वये आवटे यांनी दोन्ही लेकींनी आपल्या जन्मदात्या आईला पाच हजार रुपयांची पोटगी द्यावी असा आदेश दिला आहे. नंदा दिलीप जाधव (वय-40) आणि वंदना प्रवीण सुळे (वय-42) या दोन लेकींची नावं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.