मुंबई ईडी प्रमुखांची पदावरुन हकालपट्टी, कार्यकाळही तीन वर्षांनी कमी केला

मुंबई ईडी प्रमुखांची पदावरुन हकालपट्टी, कार्यकाळही तीन वर्षांनी कमी केला

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंत्रिमंडळाने नियुक्त केलेल्या समितीने अंमलबजावणी संचलनालयाचे (ईडी) मुंबई विभागाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल यांची पदावरुन हकालपट्टी केली. तसंच विनीत अग्रवाल यांचा कार्यकाळही तीन वर्षांनी कमी करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल- केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंत्रिमंडळाने नियुक्त केलेल्या समितीने अंमलबजावणी संचलनालयाचे (ईडी) मुंबई विभागाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल यांची पदावरुन हकालपट्टी केली. तसंच विनीत अग्रवाल यांचा कार्यकाळही तीन वर्षांनी कमी करण्यात आला आहे. विनीत अग्रवाल यांनी नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य प्रक्रियेचे पालन न करता कार्यमुक्त केले होते. विनीत अग्रवाल यांच्या या निर्णयामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.  दरम्यान, 29 मार्च रोजी संयुक्त संचालक सत्यव्रत कुमार यांना नीरव मोदी चौकशी प्रकरणातून हटवण्याचे आदेश देण्यात आले होते.

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंत्रिमंडळाने नियुक्त केलेल्या समितीने मंजुरी दिल्यानंतर मंगळवारी हे आदेश जारी केले. त्यानंतर ईडीने अग्रवाल यांची विशेष संचालक पदावरुन हकालपट्टी करण्याचे आदेश दिले. आता मुंबईच्या संचालकांचा कारभार चेन्नईतील विशेष संचालकांना सुपूर्द करण्यात आला आहे.

कोण आहेत विनीत अग्रवाल?

- 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या विनीत अग्रवाल यांना सध्या गृह विभागात पाठवण्यात आले आहे.

विनित अग्रवाल यांना 2017 मध्ये ईडीत प्रतिनियुक्तीवर आणण्यात आले होते. विनित अग्रवाल यांचे नाव तेव्हा चर्चत होते.

- मुंबईतील ईडीचा विशेष संचालक हा पश्चिम विभागाचा प्रमुख असतो.

- महाराष्ट्रासह, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर त्यांचे नियंत्रण असते.

माल्ल्या आणि नीरव मोदीच नव्हे असे आणखी 36 धनदांडगे पळालेत देशाबाहेर...

आर्थिक घोटाळे करून किंवा कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्या धनदांडग्या व्यावसायिकांची संख्या तब्बल 36 असल्याची माहिती उघड झाली आहे. कर्जबुडव्या विजय माल्ल्या किंवा नीरव मोदी ही काही मोजकी नावं आहेत, अशा प्रकारे आर्थिक गुन्हे नोंदवले गेलेले अनेक बडे व्यावसायिक गेल्या काही वर्षांत देशाबाहेर पळून गेल्याची धक्कादायक कबुली ईडीने कोर्टापुढे दिली आहे.

ईडीने अर्थात अंमलबजावणी संचालनालयानेच ही माहिती कोर्टापुढे सादर केली. सुशेन मोहन गुप्ता नावाचा संरक्षण क्षेत्रातल्या दलालाने केलेल्या जामीन अर्जावर सुनावणीच्या वेळी ईडीने ही माहिती दिली. देश सोडून पळून जाणार नाही, कारण समाजात आपली मुळं घट्ट रुतलेली आहेत, असं या सुशेन गुप्ताच्या वतीने सांगण्यात आलं. त्याच्या या दाव्याला खोडून काढताना ईडीचे विशेष वकील डी. पी. सिंग आणि एन. के. मित्तल यांनी कोर्टाला सांगितलं की, "माल्ल्या, ललित मोदी, नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशांचीसुद्धा या समाजात याहून घट्ट मुळं होती, पण तरीही ते देश सोडून गेले. असे आणखी 36 व्यावसायिक आहेत, जे गेल्या काही वर्षांत देश सोडून पळून गेलेले आहेत."

सुशेनमोहन गुप्ता ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी आरोपी आहे आणि त्याला जामीन मिळू नये अशी मागणी ईडी तर्फे कोर्टात करण्यात आली. सुशेनच्या डायरीत RG असा उल्लेख आहे, त्याचा संदर्भ शोधण्याचा सध्या तपासयंत्रणा प्रयत्न करत आहेत. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात हा शोध अत्यंत महत्त्वाचा असून अशा ऐन मोक्याच्या वेळी गुप्ताला जामीन मिळता कामा नये, असं ईडीच्या वतीने सांगण्यात आलं.

गुप्ताला मनी लाँडरिंगच्या केसमध्ये अटक करण्यात आली आहे. गुप्ताकडे 3600 कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड खरेदी प्रकरणातली महत्त्वाची कागदपत्र असण्याची शक्यता आहे, असं या तपास यंत्रणांनी सांगितलं.

SPECIAL REPORT: तुमच्या मोबाईलमधून टिक टॉक अ‍ॅप होणार गायब

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 03:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading