सोयाबीनसह खाद्य तेलाच्या आयातीवर १५ टक्के करवाढ

सोयाबीनसह खाद्य तेलाच्या आयातीवर १५ टक्के करवाढ

तेलबिया आणि खाद्य तेल आयाती संदर्भात भारत सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतलाय.

  • Share this:

18 नोव्हेंबर : तेलबिया आणि खाद्य तेल आयाती संदर्भात भारत सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. सोयाबीनच्या आयातीवर १५ टक्के कर वाढ केली आहे. तर पाम तेल, सोयाबीन तेल, सुर्यफूल तेल, यावर देखील १५ टक्के करवाढ करण्यात आलीये. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.

क्रूड सोयाबीन आणि मोहरी तेलावर १२.५ टक्के करवाढ तर रिफाईंड सोयाबीन तेलावर १५ % करवाढ केल्याने सुमारे दशकभरानंतर झालेल्या या कारवाढीमुळे तेलबियांच्या किंमतीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. पुढील दोन दिवसांत सोयाबीनच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या निर्णयावर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी देखील हा निर्णय चांगला असल्याची प्रतिक्रिया दिलीय.

कशावर किती टक्के कर वाढ ?

सोयाबीनच्या आयातीवर १५ टक्के

पामतेलाच्या आयातीवर १५ टक्के

सोयाबीन तेलाच्या आयातीवर १५ टक्के

सूर्यफुल तेलाच्या आयातीवर १५ टक्के

क्रुड सोयाबीनच्या आयातीवर १२.५ टक्के

रिफाइन्ड सोयाबीन तेलावर १५ टक्के

मोहोरी तेलावर १२.५ टक्के

First published: November 18, 2017, 5:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading