02 डिसेंबर : राज्य सरकारने 'कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या' शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्यातील तब्बल तेराशे शाळा बंद होणार आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ७६ शाळांचा समावेश आहे.
अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 10 पेक्षा कमी आहे. अशा शाळांना शिकविण्यासाठी शिक्षकही येत नसल्याचं समोर आल्यानंतर, सरकारने हा निर्णय घेतला आहे. या डिसेंबर महिन्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे.
यामध्ये कोकण विभागतील शाळांची संख्या जास्त असून, पहिल्या टप्प्यात कोकणातील 500 शाळा बंद करण्यात येणार आहेत.
या शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नजीकच्या अन्य सरकारी वा खासगी शाळेत सामावून घेण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचा थेट भंग करणारा असल्याचे मत शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.