Home /News /maharashtra /

राज्यपालांचं शिवरायांबद्दल वक्तव्य, शरद पवारांचा जाहीर सभेतला 'तो' जुना व्हिडिओ तुफान व्हायरल

राज्यपालांचं शिवरायांबद्दल वक्तव्य, शरद पवारांचा जाहीर सभेतला 'तो' जुना व्हिडिओ तुफान व्हायरल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

    मुंबई, 28 फेब्रुवारी: 'समर्थ रामदास' यांच्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांना कुणी विचारलं असतं? असं विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नवीन वाद पेटण्याची चिन्ह आहे. राज्यपालांच्या विधानावर आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे चर्चांना आणखी उधान आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय तटकरे यांनी शरद पवारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी राज्यपालांना खरे गुरू कोण, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. व्हायरल व्हिडिओत काय म्हटलं आहे शरद पवारांनी शरद पवार यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, जे लोक सांगतात रामदास स्वामी महाराजांचे गुरू होते. ते खोटं आहे. शिवाजी महाराजांचे खरे गुरू जिजाऊ माता होत्या. त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जिजाऊंनी केलं. शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला, तर रामदास नव्हते. शरद पवार यांचा हा व्हिडिओ एका जाहीर कार्यक्रमातला आहे. पुढे व्हिडिओत ते म्हणतात की, ज्यांच्या हातात लेखणी होती, त्यांनी ही कमाल केली. त्यांनी इतिहासात रामदास गुरू असल्याचं लिहून ठेवलं. काय म्हणाले राज्यपाल 'आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी संकल्प केला होता आणि त्यांच्यामध्ये संकल्प पूर्ण कऱण्यासाठी समर्थ रामदास यांच्यासारखे गुरू मिळाले होते. राजा, महाराज, या सर्वांना गुरू होते. चाणक्याशिवाय चंद्रगुप्तला कोण विचारणार होतं. समर्थ यांच्या शिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारणार होतं' असं राज्यपाल म्हणाले. तसंच, 'शिवाजी महाराज हे काही चंद्रगुप्त इतके लहान नाही परंतु, त्यांच्या पाठीमागे जसा आईचा हात होता, तसेच गुरू उभे होते. समाजामध्ये गुरूचे मोठे स्थान आहे' असंही राज्यपाल म्हणाले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Governor bhagat singh, Sharad Pawar (Politician)

    पुढील बातम्या