Home /News /maharashtra /

Jayant Patil : राज्यपालांनी अडीच वर्षे ऐकलं नाही आतातरी 12 आमदारांची नियुक्ती करा जयंत पाटलांचा राज्यपालांना खोचक टोला

Jayant Patil : राज्यपालांनी अडीच वर्षे ऐकलं नाही आतातरी 12 आमदारांची नियुक्ती करा जयंत पाटलांचा राज्यपालांना खोचक टोला

महाविकास आघाडीचे (Mahavikas aghadi) आणि भाजपसह (bjp) बंडखोर आमदारांनी विधानभवनात मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.

  मुंबई, 03 जुलै : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला (Assembly Special Session) थोड्याच वेळात सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) होणार असल्याने महाविकास आघाडीचे (Mahavikas aghadi) आणि भाजपसह (bjp) बंडखोर आमदारांनी विधानभवनात मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात करताना उपाध्यक्ष यांनी राज्यपालांनी (Maharashtra state government) दिलेल्या आदेशाचे वाचन केले यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (ncp leader jayant patil) यांनी राज्यापालांच्या निर्णयावर खोचक टीका केल्याने सभागृहात एकच हशा पिकला.

  विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी राज्यातील आमदार सभागृहात दाखल झाले होते. दरम्यान शिवसेनेतील 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राज्यपालांकडे दिला तसेच विधानसभेच्या अध्यक्षपद निश्चित करण्याची ही मागणी केली होती. याबाबत जयंत पाटील यांनी नरहरी झिरवळ यांची परवानगी घेत. राज्यपालांना विनंती वजा सल्ला दिल्याने त्याची जोरदार चर्चा सभागृहात रंगली.

  हे ही वाचा : शिवसेनेची मोठी खेळी, शिंदे गट विधानभवनात पोहोचण्याआधीच कार्यालयाचे 'दार' केले बंद!

  जयंत पाटील म्हणाले मागच्या अडीच वर्षांपासून आम्ही राज्यपालांकडे 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी बऱ्याच वेळा त्यांच्याकडे विनंती केली परंतु त्यांनी ही मान्य केली नाही. राज्यपालांनी भाजप आणि शिंदे गटाची सत्ता येण्याच्या मार्गावर असताना मात्र 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत विचार केला. मुख्यमंत्र्यासह कित्येक मंत्र्याचे शिष्टमंडळ राज्यापालांना भेटले परंतु त्यांनी यावर कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यपालांनी आता आलेल्या सरकारची मागणी मान्य करून आम्ही दिलेल्या 12 आमदारांची यादी तशीच ठेवून त्यांना लवकर पद द्यावे ही विनंती करत असल्याचे ते म्हणाले.

  हे ही वाचा : PHOTOS: बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे आमदारांसह पहिल्यांदाच कडक बंदोबस्तात विधानभवनात

  याचबरोबर विधानसभेच्या अध्यक्षपदाची नियुक्तीसाठी राज्यापालांकडे मागणी करूनही त्यांना यावर निर्णय घेण्यासाठी वेळ मिळाला नाही परंतु त्यांनी  विरोधकांच्या मागणीला लगेच मान्यता देत विधानसभेचे अध्यक्ष पदाची निवडणुक घेतली तसेच 12 आमदारांच्या नियक्तीबाबत विचार करावा असे पाटील म्हणाले. यावरून सभागृहात एकत हशा पिकला.

  या दोन आमदारांची अनुपस्थिती

  राष्ट्रवादी काँग्रेसचे जेलमध्ये असलेले नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. या मदतानास उपस्थित राहण्यासाठी त्यांनी कोर्टाची परवानगी घेतली नव्हती. 10 जूनला झालेल्या राज्यसभा निवडणूक आणि 20 जूनला झालेल्या विधान परिषद निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मत देता आलं नव्हतं. तर उद्धव ठाकरे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाला मतदान करण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली होती. पण, त्यापूर्वीच ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Assembly Election, Governor bhagat singh, Jayant patil, Maharashtra News

  पुढील बातम्या