मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदमुक्त होण्याचे संकेत? आपल्या राज्यात परत जाण्याची व्यक्त केली इच्छा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदमुक्त होण्याचे संकेत? आपल्या राज्यात परत जाण्याची व्यक्त केली इच्छा

(file photo)

(file photo)

राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. सर्वच स्तरातून टीका होत असताना आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Khushalkant Dusane

मुंबई, 28 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम वादात सापडतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल नवं विधान केलं आहे. 'आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील' असं विधान राज्यपालांनी केलं आहे.

यानंतर राजकीय पक्षांसह काही संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. सर्वच स्तरातून टीका होत असताना आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या राज्यात परत जाण्याची व्यक्त केली इ्च्छा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांनी राज्यपाल पदावरुन पदमुक्त होण्याचे संकेत? दिले की काय, अशी चर्चा रंगली आहे.

राज्यपालांविरोधात संभाजीराजे आक्रमक - 

'छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहे' असं म्हणून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी वादाला तोंड फोडले होते. पण, आठवडा उलटला तरीही राज्यपालांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांनी शिंदे सरकाराला कडक इशारा दिला आहे.

भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? असा थेट सवाल संभाजीराजे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. राज्यपालांवर जर कोणतीही कारवाई होणार नसेल तर महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असा इशाराच संभाजीराजे यांनी दिला आहे.

हेही वाचा - मेट्रो कारशेड समितीचा अहवाल दाबला का? किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

'...हा राजद्रोहच म्हणायला हवा', संजय राऊत राज्यपालांवर भडकले -

'वीर सावरकरांच्या अपमान प्रकरणात भाजपने जो जोश व जोर दाखवला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रकरणात दाखवला नाही. उलट छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचे समर्थन केले. शिवरायांचे चरित्र विसरले जात आहे. महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होत आहे काय? असा सवाल करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून भाजपवर निशाणा साधला.

First published:

Tags: Governor bhagat singh, Maharashtra politics