मुंबई, 22 जून : शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेचे आमदार फोडून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. 33 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे (eknath shinde in Guwahati) यांनी मोठ्या बंदोबस्तात मध्यरात्री गुवाहाटीला दाखल झाले.आता एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. (Maharashtra governor bhagat singh koshyari affected corona positive) परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा भेट होणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने राज्यातील शिवसेने विरोधातील आणखी तीन दिवस बंड कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे पुढचे तीन दिवस महत्वाचे असल्याचे बोलले जात असल्याने राज्यात पुढे काय होणार हे पुढच्या तीन दिवसांत समजणार आहे. एकनाथ शिंदे आज मुंबईला राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीसाठी येणार असल्याचे सांगण्यात आले होते. (eknath shinde and bhagat singh koshyari)
हे ही वाचा : Eknath Shinde : ठाकरे सरकारचा आज शेवटचा दिवस, एकनाथ शिंदे मोठी खेळी करणार, मुंबईत येणार?
परंतु राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने आता गोव्याचे राज्यपाल यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल म्हणून नियक्ती होणार आहे. राज्यपाल कोश्यारी हे एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाल्याने एकनाथ शिंदे यांची भेट आता गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी होणार आहे.
आधीच शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची निवड केली आहे. पण सेनेकडे फक्त १७ आमदार असल्याचे पत्र दिले होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे दावा करू शकतात. त्यांच्या दाव्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : शिवसेनेच्या आमदारांना फिरण्याच्या बहाण्याने गुजरातला नेलं, आणि.... आमदाराने सांगितला रात्रीचा थरार
शिवसेनेच्या 5 बंडखोर आमदारांना सूरतमध्ये मारहाण?
शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या सूरतच्या एका हॉटेलमध्ये आहेत. हे सर्व आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेले आहेत. या आमदारांमध्ये नितीन देशमुख यांचादेखील समावेश आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आमदार नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या पाच आमदारांना सूरतमध्ये मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पाचही आमदारांना महाराष्ट्र परत यायचं होतं. त्यातूनच त्यांना मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे या मारहाणीची गंभीर दखल गृह खात्याकडून घेण्यात आली आहे. ज्या आमदारांना मारहाण झाली आहे त्या आमदारांच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी नितीन देशमुख यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आणखी दोन आमदारांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Governor bhagat singh, Maharashtra News, Shiv Sena (Political Party)