Home /News /maharashtra /

Governor bhagat singh koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजभवनात परतण्याची शक्यता, राज्यातील घडामोडींना वेग

Governor bhagat singh koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजभवनात परतण्याची शक्यता, राज्यातील घडामोडींना वेग

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेचे आमदार (shiv sena mla) फोडून मोठा शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. 40 च्यावर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले

  मुंबई, 23 जून : एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेचे आमदार (shiv sena mla) फोडून मोठा शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. 40 च्यावर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. (eknath shinde in guwahati). दरम्यान एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होणार होते. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची भेट टळली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांची प्रकृती उत्तम असल्याचे मेडिकल बुलेटीनच्या माध्यमातून समजते आहे. 

  हे ही वाचा : आता देवेंद्र फडणीवस नॉट रिचेबल! महाराष्ट्रातली राजकीय उलथापालथ शेवटच्या टप्प्यात

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्या (दि.24) राजभवनात परतण्याची शक्यता आहे.  यामुळे राज्यातील घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. ते उद्या राजभवनात जाणार का याबाबत आज संध्याकाळपर्यंत डॅाक्टर निर्णय घेणार आहेत. राज्यपाल कोश्यारी यांची तब्बेत अत्यंत चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे. बुधवारी कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले होते. सध्याच्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभुमीवर राज्यपाल राजभवनावर कधी परतनार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातल्यानंतरही शिवसेनेचे आणखी काही आमदार गुवाहटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत. हे सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून ते आज गुवाहाटीला पोहोचतील अशी माहिती आहे. आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar), सदा सरवणकर (Sada Sarvankar), दादा भुसे (Dada Bhuse), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), संजय राठोड (Sanjay Rathod) आणि दिलीप लांडे (Dilip Lande) यांच्याशी संपर्क झालेला नाही.

  हे ही वाचा : अबतक 36! एकनाथ शिंदेंच्या गटाची ताकद आकडाच ठरवणार; मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतरही गळती थांबेना

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) काल वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर दाखल झालेत. काही ठिकाणी शिवसैनिक (Shivsena) रस्त्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत, तर दुसरीकडे गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनामध्ये असलेल्या आमदारांची संख्या वाढत आहे.

  शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी पुकारलेले बंड यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता आहे. पण अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.  मुख्यमंत्र्यांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे मात्र आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Governor bhagat singh, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या