शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यपालांकडून 8 हजार रुपयांची मदत जाहीर

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यपालांकडून 8 हजार रुपयांची मदत जाहीर

2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठीही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर : राजपाल  भगतसिंह कोश्यारी यांच्या आदेशानुसार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. दर हेक्टरी 8 हजार रुपयांची मदत तर 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठीही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. फळबागा आणि बागायतीसाठी 18 हजार रुपये प्रति हेक्टरी मदत देण्यात येणार असल्याचं राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. राज्यपालांच्या या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची शाळा आणि कॉलेजची परीक्षा फी माफ करण्यात येईल असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. अवकाळी पाऊस आणि त्यामुळे राज्यातील पिकांचं झालेलं नुकसान यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. औरंगाबादमधील पिंपरीराजा गावातील शेतीची अवस्था पाहिली तर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. पावसाळ्यात नेमका पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली. तर आता काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीचं पिकही धोक्यात आलं.

एकीकडे शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत तर मजुरांना देण्यासाठीही आता पैसे उरले नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे. सरकार आमच्यासाठी काहीच करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. अवकाळी पावसामुळे राज्यातली शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या नजरा मायबाप सरकारकडं लागल्या असल्या तरी  राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ संपत नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या सहनशीलतेला अंत झाला.

वकाळी पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसला. सांगली जिल्ह्यातील शेतकरी यामुळं अक्षरश: देशोधडीला लागले. शेतकऱ्यांवर हजारो किलोंची द्राक्ष फेकून देण्याची वेळ आली आहे. तर प्रशासनाने तातडीनं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 16, 2019, 6:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading