मराठा आरक्षण : आता मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणाची फी राज्य सरकार भरणार

मराठा आरक्षण :  आता मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणाची फी राज्य सरकार भरणार

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे तब्बल 28 कोटी रुपयांचा भार हा सरकार उचलणार आहे. त्यामुळे आता सर्व विद्यार्थ्यांनी मेडिकल कॉलेजचे पर्याय नव्यानं देण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 मे : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा तिढा अखेर सुटला आहे. कारण मराठा आरक्षणांतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांची फी राज्य सरकार भरणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. अण्णाभाऊ पाटील महामंडाळामार्फत विद्यार्थ्यांची फी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे तब्बल 28 कोटी रुपयांचा भार हा सरकार उचलणार आहे. त्यामुळे आता सर्व विद्यार्थ्यांनी मेडिकल कॉलेजचे पर्याय नव्यानं देण्याची सूचनाही देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

नव्यानं पर्याय निवडल्यानंतर सुरुवातीला शासकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर मराठा समाजातील उरलेल्या विद्यार्थांना खासगी महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल. यावेळी विद्यार्थ्यांची जास्तीची फी ही राज्य सरकार भरणार आहे.

हेही वाचा : 'मी वडील राजीव गांधी यांच्यासोबत INS विराटवर गेलो होतो'; राहुल गांधी यांची कबुली

आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर निदर्शने केली होती. त्याचबरोबर निदर्शनं करणारे विद्यार्थी आणि मराठा समाजाचं एक शिष्टमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही गेलं होतं.

राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मेडिकलच्या विद्यार्थांचा प्रश्न सोडवावा, यासाठी राज्यभरातून मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी मुंबईत आले होते. मुंबईत दाखल होताच त्यांनी निदर्शने करून राज्य सरकारला ईशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला.

दरम्यान, महाराष्ट्रात 30 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा आरक्षण लागू करण्यात आलं. मात्र नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार या आरक्षणाचा लाभ मेडिकल विभागातील कोणत्याच विद्यार्थ्याला घेता येत नाही. कारण मराठा आरक्षण लागू होण्याआधी 13 नोव्हेंबर रोजी मेडिकलचे नोटिफिकेशन आल्याने त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार नव्हता. पण, आता त्यांना पुन्हा एकदा पर्याय निवडता येणार आहे.

खरंतर, नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता त्यावर तोडगा निघाल्यामुळे या निर्णयाचं स्वागत होतं आहे.

VIDEO : शीख दंगलींच्या मुद्द्यावरून मोदींनी काँग्रेसवर केले गंभीर आरोप

First published: May 10, 2019, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading