ठाकरे सरकारची मोठी घोषणा, मुस्लीम आरक्षणासाठी कायदा करणार!

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, मुस्लीम आरक्षणासाठी कायदा करणार!

लवकरच यादृष्टीने कायदा करुन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : मुस्लीम आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्य सरकार मुस्लिमांना आरक्षण मिळवून देण्यासाठी कायदा करणार आहेत. कॉंग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही घोषणा केली आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. यादृष्टीने मुस्लीम आरक्षणाचा कायदा करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल. शैक्षणिक प्रवेश सुरू होण्यापूर्वी हा कायदा करू, असं आश्वासन नवाब मलिक यांनी दिलं आहे. उच्च न्यायालयानं मुस्लीम समाजाला शैक्षणिक संस्थामधल्या प्रवेशासाठी दिलेलं पाच टक्के आरक्षण अबाधित ठेवलं आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरात लवकर घटनेला धरूनच निर्णय घेण्यात येणार आहे. मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ही घोषणा केली आहे. मुस्लीम आरक्षणाबाबत 2014 प्रमाणे अध्यादेश काढून त्याचे कायद्यात रुपांतर करु, असं आश्वासन अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक य़ांनी विधानपरिषदेत दिले आहे. उच्च न्यायालयाने मुस्लीम आरक्षणाबाबत जे मान्य केलं आहे त्यादृष्टीने राज्यात तातडीने मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. नवाब मलिक यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मुस्लीम आरक्षणाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा -...नाहीतर OBCची महाराष्ट्रात वेगळी जनगणना करा, आमदार आक्रमक

 

First published: February 28, 2020, 2:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading