राज्यात गाढवांवर संकट, दिले संरक्षणाचे आदेश!

राज्यात गाढवांवर संकट, दिले संरक्षणाचे आदेश!

देशात गाढवांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गाढवं कमी होण्याच्या संख्येत केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी  

मुंबई, 08 मे : राज्यात गाढवांना संरक्षण द्या आणि त्यांची जपणूक करा. याबाबतची मोहीम राज्य सरकारने सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या आदेशाने ही मोहीम राबण्यात येत असल्याचं सह आयुक्त डॉक्टर धनंजय परकले यांनी सांगितलं.

देशात गाढवांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गाढवं कमी होण्याच्या संख्येत केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. आपल्या राज्यात गाढवांची संख्या किती आहे? आणि का कमी होत आहे? याचा आढावा घेण्याचे आदेश प्रत्येक राज्याला देण्यात आले आहेत. हेच आदेश राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकारी यांना पाठवले आहेत. त्यानुसार पशुगणनेत गाढवांच्या संख्येवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

देशात गाढवांच्या अवैध तस्करीच्या घटना वाढू लागल्यानं केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी 10 सप्टेंबरला तातडीने बैठक बोलावली होती. त्यात गाढवांची देशात कमी होणारी संख्या यावर चर्चा करण्यात आली.

मांससाठी गाढवांचा होणार वापर, गाढवाच्या अवयवाची तस्करी आणि औषधं म्हणून चीनमध्ये होणार वापर यामुळे गाढवांच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे गाढवांची प्रजाती धोक्यात येते की काय याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा : VIDEO: 'जन्मदात्यांपासून जीवाला धोका', कोर्टाची पायरी चढणाऱ्या प्रियांकाची धक्कादायक गोष्ट

उत्तर भारतात गाढवांची संख्या कमी होत असली तरी राज्यात ती चिंताजनक नाही. महाराष्ट्रामध्ये 2007 च्या पशु गणानेत 32 हजार गाढव होती. ती 2012 च्या गणानेत 29 हजार झाली आहेत. आणि आता 2019 ची आकडेवारी येणे बाकी आहे.

राज्यात गाढवांची संख्या नाममात्र कमी झाली आहे. त्यात कुंभार आणि मातीकाम करण्यासाठी पारंपरिक व्यवसाय मागे पडू लागला आहे. तसंच इतर कामात गाढवांचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे गाढवांची संख्या कमी दिसतेय. मात्र तस्करीसाठी गाढवांचा वापर होत नसल्याचं उपायुक्त धनंजय परकले यांनी सांगितलं.

असं असलं तरी केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार राज्यात गाढवांच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी ती कमी होणार नाही यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना केल्याचं डॉ. परकले यांनी सांगितलं.

VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद

First published: May 8, 2019, 3:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading