ग्रामविकास विभागात 13 हजार 514 जागांची मेगाभरती

ग्रामविकास विभागात 13 हजार 514 जागांची मेगाभरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. कारण ग्रामविकास विभागानं 13 हजार रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 2 मार्च : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आता सुवर्ण संधी मिळाली आहे. कारण, ग्रामविकास विभागानं 21 पदांसाठी 13 हजार 514 जागांची मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरूणांना सुवर्णसंधी चालून आली आहे. ग्रामविकास विभागाअंतर्गत विविध प्रकारच्या २१ पदांवर ही मेगाभरती होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त आहेत. ही पदं भरल्यास कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल. शिवाय नव्या उमेदवारांना देखील नोकरीची संधी मिळणार आहे. दरम्यान, ग्रामविकास विभागानं भरतीचे आदेश काढले आहेत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

ग्रामविकास विभागाच्या आस्था ८ अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), ग्रामसेवक (कंत्राटी), आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरूष ५० टक्के), आरोग्य सेवक (पुरूष ४० टक्के), आरोग्य सेविका, स्थापत्य अभियंता (सहायक), पशूधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहायक (लेखा), वरिष्ठ सहायक (लिपीक), अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ सहायक (लिपीक), कनिष्ठ लेखा अधिकारी आणि कनिष्ठ यांत्रिकी आदी पदांसाठी ही भरती होणार आहे.

ही मेगा भरती राज्यातील सहाही विभागात होणार असून सर्वाधिक जागा पुणे विभागात २ हजार ७२१ असून तर त्या खालोखाल औरंगाबाद विभागात २ हजार ७१८ आहेत. नाशिक विभागात २ हजार ५७४, कोकण विभागात २ हजार ५१, नागपूरमध्ये १ हजार ७२६ तर अमरावती विभागात १ हजार ७२४ अशा एकूण १३ हजार ५१४ जागांवर तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. सर्व पदांची भरती व त्याचे आरक्षण शासन नियमानुसार होणार असून तशी जाहिरात प्रत्येक जिल्हा परिषदेकडून वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्यास सुरवात होणार आहे.

==============================

First published: March 2, 2019, 10:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading