मराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण

मराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण

ज्या विकासाच्या मुद्द्यावर भाजप सरकार सत्तेवर आले ते विकासाचे मुद्दे कसे बोगस आहेत हे या सरकारने दाखवून दिले

  • Share this:

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

कोल्हापूर, 14 नोव्हेंबर : मराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही. सरकार फक्त आचारसंहिता लागू होण्याची वाट पाहत आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्याप्रमाणेच मराठा आरक्षणाची सुद्धा बोळवण करणार असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज राज्य सरकारवर केले आहेत. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ज्या विकासाच्या मुद्द्यावर भाजप सरकार सत्तेवर आले ते विकासाचे मुद्दे कसे बोगस आहेत हे या सरकारने दाखवून दिले. देशाची अर्थव्यवस्था प्रचंड अडचणीत आहे अशी टीकाही चव्हाण यांनी केली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार आहे. वारंवार बैठका होत आहेत यासाठी आमच्या वाटाघाटी सुरू आहेत अशी माहितीही चव्हाण यांनी दिली.

महाराष्ट्रावर दुष्काळाचे मोठे संकट उभे ठाकले असताना हे सरकार अजूनही याकडे गांभीर्याने पाहत नाही अशी टीका चव्हाणांनी केली.

राफेलच्या मुद्यावरून सुद्धा यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. त्यामध्ये १३६ राफेल विमानपैकी केवळ ३६ विमाने घेण्याचा निर्णय फक्त नरेंद्र मोदी यांनी घेतला तो बेकायदेशीर आहे. त्यावर कायदेशीर प्रक्रिया होऊ शकते याची कबुली सुप्रीम कोर्टाला प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सरकारने दिली आहे असं चव्हाण म्हणाले.

त्याचबरोबर राफेलची चौकशी होऊ नये म्हणून सरकारने सीबीआयच्या नेतृत्वाला गारद करून सीबीआयच्या संचालकांना यामधून काढून टाकले.याची सुद्धा चौकशी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. कोर्ट कदाचित या सीबीआयच्या संचालकांना पुन्हा आपल्या खुर्चीवर बसवू शकेल  त्यानंतर मात्र मोदींना राजीनामा दिल्याशिवाय काही पर्याय नसेल असा दावाही चव्हाण यांनी केला.

===================

First published: November 14, 2018, 8:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading