शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी, उसाच्या एफआरपी दरात वाढ

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी, उसाच्या एफआरपी दरात वाढ

एफआरपी म्हणजे फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईज, अर्थात रास्त आणि किफायतशीर दर

  • Share this:

24 मे : केंद्र सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. एफआरपीच्या दरात अडीचशे रुपयांची वाढ करण्यात आलीये. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही घोषणा केलीये.

एफआरपीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलाय. या निर्णयाचा राज्यातल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

एफआरपी म्हणजे काय?

– एफआरपी म्हणजे फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईज, अर्थात रास्त आणि किफायतशीर दर

– उसाचा एकूण उत्पादन खर्च आणि त्यावर साधारण 15 टक्के नफा गृहित धरून एफआरपी निश्चित केला जातो

– केंद्र सरकारचा कृषी आयोग हा दर ठरवतं

– उसाचा उतार वाढला की एफआरपी वाढतो

– आंतरराष्ट्रीय आणि देशी बाजारपेठेत साखरेचे दर पडले आहेत आणि बँका कारखान्यांना याच बाजारभावानुसार उचल देतात

– बँकांनी दिलेली उचल आणि एफआरपी यांच्यात किमान 400 रुपयांचा फरक पडतोय

First published: May 24, 2017, 8:49 PM IST

ताज्या बातम्या