सरकार कधी स्थापन होणार? भाजप नेता म्हणाले, 'अज्ञानात सुख असते'

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस झाले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हलचाली सुरु झाल्या नाहीत.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 12:53 PM IST

सरकार कधी स्थापन होणार? भाजप नेता म्हणाले, 'अज्ञानात सुख असते'

पुणे, 04 नोव्हेंबर: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस झाले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हलचाली सुरु झाल्या नाहीत. त्यात सध्या राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. एका बाजूला नवे सरकार स्थापन करण्यासंदर्भात काहीच चर्चा होत नसताना दुसऱ्या बाजूला सर्व पक्षाचे नेते मात्र शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी दौऱ्य़ावर जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील अशाच दौऱ्यावर असताना पत्रकारांनी सरकार कधी स्थापन होणार यावर त्यांनी 'अज्ञानात सुख असत', असे उत्तर दिले.

राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारबद्दल बऱ्याच चर्चा सुरु आहेत. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, महसूल खाते जाणार, अर्थ खाते जाणार, राज्यात गडकरी येणार अशा चर्चा फक्त मीडियात आहेत. सरकार स्थापने संदर्भात काय ठरले होते किंवा काय ठरणार याबद्दल मला काहीच माहिती नाही. या चर्चेवेळी मी आधीही नव्हता आणि यापुढेही नसेन. राज्यात सरकार कधी स्थापन होईल किंवा नव्या सरकारचा शपथविधी कधी होईल यावर या प्रश्नावर पाटील यांनी अज्ञानात सुख असत', असे उत्तर दिले.

दिल्लीत होणार महाराष्ट्राचा फैसला? शहा-फडणवीस तर सोनिया-पवार यांची भेट आज!

राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असेल तरी अद्याप कोणत्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. शिवसेनेने मुख्यमंत्री आणि अन्य महत्त्वाची खाती मागितली आहेत. लोकसभा निवडणुकीआधी ठरलेल्या प्रमाणे सत्ते वाटप व्हावे, या मतावर शिवसेना ठाम आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच हे स्पष्ट केले आहे की, मीच पाच वर्षासाठी मुख्यमंत्री असेन. शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरु असलेल्या या वादात राष्ट्रवादी काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. शिवसेनेने जर सरकार स्थापनेचा दावा केला तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना बाहेरून पाठिंबा देऊ शकतो. अशा परिस्थितीत त्यांना काँग्रेसच्या पाठिंब्याची देखील गरज असेल.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर बोलोताना चंद्रकांत पाटील म्हणाले, साधारण 10 हजार कोटींची प्राथमिक मदत आहे. ही रक्कम वाढू देखील शकते. राज्यात 6 तारखेपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. विम्यात सरकारचा वाटा 75 टक्के आहे. ज्यांनी विमा काढला नाही त्यांना देखील मदत करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

Loading...

राज्यपालांना भेटण्यामागचं संजय राऊत यांनी सांगितलं कारण, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 12:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...