डान्स बार सुरू करण्याची सरकारची इच्छा नाही? पुनर्विचार याचिका दाखल करणार!

डान्स बार सुरू करण्याची सरकारची इच्छा नाही? पुनर्विचार याचिका दाखल करणार!

'सुप्रीम कोर्टाचा सन्मान राखत डान्सबारच्या नावाखाली अनुचित पायंडा पुन्हा सुरू होणार नाही, असाच प्रयत्न राज्य सरकारचा असेल.'

  • Share this:

मुंबई 17 जानेवारी : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यात पुन्हा डान्स बार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. सुप्रीम कोर्टानं सुनावणी करताना राज्य सरकारनं घातलेल्या अनेक जाचक अटी रद्द केल्या आहेत. असं असलं तरी राज्य सरकार डान्स बार सुरू करण्यासंदर्भात फारसं अनुकूल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकार पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. कोर्टानं सरकारच्या बहुतेक अटी व्यवहार्य नसल्याचं सांगत रद्द केल्या. डान्सबारमध्ये दारू वाटण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनीही सरकारवर जोरदार टीका केलीय.

राज्य सरकारने ठाम भूमिका मांडली नाही त्यामुळेच डान्स बार सुरू करण्याचा निर्णय झाला अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. सरकारने येणाऱ्या अधिवेशनात बंदी घालण्याचा पुन्हा कायदा आणावा अशी मागणीही त्यांनी केलीय. तर डान्स मालक आणि मुख्यमंत्र्यांचं साटं लोटं आहे असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. तर डान्स बार सुरू होणं हे सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय.

सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारसंदर्भात दिलेला निर्णय हा संमिश्र स्वरूपाचा आहे. तथापि डान्सबारसंदर्भातील राज्यातील जनतेच्या भावना प्रतिकूल आहेत. त्यामुळे त्या भावनांचे प्रतिबिंब या निकालात नाही. या निकालाच्या अधीन राहत आणि सुप्रीम कोर्टाचा सन्मान राखत डान्सबारच्या नावाखाली अनुचित पायंडा पुन्हा सुरू होणार नाही, असाच प्रयत्न राज्य सरकारचा असेल अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी व्यक्त केलीय.

 कोर्ट काय म्हणालं?

- डान्स बार संध्याकाळी 6.30 ते 11.30 दरम्यान सुरू राहणार

- डान्स बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज नाही

- डान्स बारच्या सीसीटीव्हीमुळं व्यक्तिस्वातंत्र्याचे हनन

- शाळा कॉलेज आणि धार्मिक स्थळाच्या एक किलोमीटर परिसरात बार नसावे

- बारमध्ये तरुणींना टीप देण्यास परवानगी, मात्र पैसे उधळता येणार नाही

- बारमध्ये दारू विक्रीला परवानगी

- बार आणि डान्सिंग एरिया वेगळं ठेवण्याची अट रद्द

VIDEO : ...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी

First published: January 17, 2019, 2:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading