शेतकऱ्याची थट्टा; खरीप पिकाच्या अनुदानापोटी खात्यात आले केवळ 4 रूपये!

शेतकऱ्याची थट्टा; खरीप पिकाच्या अनुदानापोटी खात्यात आले केवळ 4 रूपये!

सरकारनं शेतकऱ्यांची थट्टा चालवल्याचं चित्र माढा तालुक्यात समोर आलं आहे.

  • Share this:

सोलापूर, सागर सुरवसे, 22 मे : नापिकी आणि कर्जाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्याची आता सरकारी यंत्रणांकडून देखील थट्टा सुरू आहे. कारण, 2018सालच्या खरीप पिकाच्या अनुदानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ 4 रूपये जमा करण्यात आले. पंडित इंगळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. पंडित इंगळे हे माढा तालुक्यातील ढवळस गावचे रहिवासी आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीत झालेला हा काही पहिला प्रकार नाही. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या काही घटना समोर आलेल्या आहेत. पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्याच्या हाताशी आलेलं पिक देखील गेलं. पाण्याची अभावी डोळ्यादेखत पिकं वाळली. त्यामुळे आता करायचं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यापुढं उभा राहिला. दरम्यान, सरकारकडून अनुदान तरी मिळालं पण केवळ चार रूपयाचं. त्यामुळे सरकारी यंत्रणांच्या ढिसाळ कारभाराचा फटका पुन्हा एकदा बळीराजाला बसला.

कर्जाच्या गर्तेत शेतकरी

शेतकरी सध्या नापिकीमुळे कर्जात अडकलेला आहे. कर्जबाजारीपणामुळे बळीराजा आत्महत्या करत असताना आता सरकारकडून देखील थट्टा सुरू आहे. दरम्यान, सरकार सध्या शेतकरी कर्जमाफीवर गांभीर्यानं विचार करत आहे.

निकालादिवशीच कोल्हापुरात राजकीय नेत्यांना ‘नो एन्ट्री’

सरसकट कर्जमाफी होणार?

राज्य सरकार आता शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी आता राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. मार्च 2016 ते 2018 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा सध्या राज्य सरकार गांभीर्यानं विचार करत आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्ष विधानसभेची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे. शिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुलैपासून राज्यभर विकास यात्रा देखील काढणार आहेत. राज्यात सध्या भीषण दुष्काळ असून सध्या शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहे. यापूर्वी देखील राज्य सरकारनं काही निकषांवर शेतकरी कर्जमाफी केली होती. पण, आता सरसकट कर्जमाफीचा विचार राज्य सरकार करत आहे.

SPECIAL REPORT : एक्झिट पोल खरंच विश्वासार्ह आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 10:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading