LIVE NOW

LIVE : पंकजा मुंडेंनी जाहीर केली भविष्याची दिशा, 26 जानेवारीपासून महाराष्ट्रभर संघर्ष करणार

गोपीनाथ गड इथं आज होणाऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार आहेत.

Lokmat.news18.com | December 12, 2019, 3:26 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated December 12, 2019
auto-refresh

Highlights

2:52 pm (IST)

पंकजा मुंडे यांचे भाषण
-पक्षाची गरीमा ठेवण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे     
-आपण पक्ष रिव्हर्स गीअरमध्ये नेऊ नये         
-पक्ष हा एका व्यक्तीचा नाही     
-मला कोणत्या पदाची अपेक्षा नाही     
-मला विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून कोणी कारस्थान करत आहे का?         
-मी पक्ष सोडावं अशी कुणाची अपेक्षा आहे?     
-मी बंड करणार ही पुडी कुणी सोडली?    
-माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचं संस्कार     
-माझी अपेक्षा कुणाकडून नाही         
-मी का बंड करु     
-शेवटच्या दिवसापर्यंत भाजपचा एक एक आमदार निवडून यावा यासाठी प्रयत्न करत होते
-गोपीनाथ मुंडेंनी कधी कुणाच्या पाठित खंजीर खुपसला नाही         
-गोपीनाथ मुंडेंचं रक्त अळणी नाही         
-फाटक्या लोकांनी माझी संघर्षयात्रा काढली     
-गेल्या काही दिवसात राजकारणाचा जेवढा अनुभव आला तेव्हा कधीच आला नव्हता     
-अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली हे कुणाला कसं कळलं नाही         
-पराभवासारख्या चिल्लर गोष्टींनी खचणारी मी नाही     

 

Load More
बीड, 12 डिसेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ गड इथं आपल्या समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मुंडे समर्थक गोपीनाथ गड इथं दाखल झाले आहेत. या मेळाव्यात पंकजा मुंडे आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार आहेत.