मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'गोपीनाथ मुंडेंना त्रास दिला, आता पंकजांसोबत...', खडसेंचा गौप्यस्फोट

'गोपीनाथ मुंडेंना त्रास दिला, आता पंकजांसोबत...', खडसेंचा गौप्यस्फोट

एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांना त्रास देण्यात आल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana, India

राहुल खंडारे, प्रतिनिधी

बुलढाणा, 31 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांना त्रास देण्यात आल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडे हयात असताना भाजपने त्यांना किती त्रास दिला हे मला माहिती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांना सकाळी 4 वाजेपर्यंत ताटकळत ठेवलं होतं, असा खळबळजनक दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भाजपला कंटाळून गोपीनाथ मुंडे भाजप सोडणार होते, इतका त्यांना त्रास झाला. तोच प्रकार आता पंकजा मुंडे यांच्यासोबत होत आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

2014 साली केंद्रात भाजपचं सरकार आलं तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पदाची शपथ घेतली. पण मंत्री झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं दिल्लीत अपघाती निधन झालं. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात 2014 लाच विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हाही भाजपचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांनाही ग्रामविकास तसंच महिला व बालकल्याण अशी महत्त्वाची खाती देण्यात आली होती.

2019 विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. पंकजा यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनीच त्यांना धक्का दिला. तेव्हापासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पंकजा मुंडे यांनी मात्र कायमच या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: BJP, Eknath khadse, Pankaja munde