मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पवारांनी ‘येडं पेरलं अन्..’, पडळकरांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर जोरदार टीका

पवारांनी ‘येडं पेरलं अन्..’, पडळकरांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर जोरदार टीका

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे इथं गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यत आयोजित केली होती.

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे इथं गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यत आयोजित केली होती.

'जर सगळं गावच करणार असेल तर सरकार काय करणार आहे? तुम्ही जबाबदारी दुसऱ्यावर सोपवून काय काम करणार आहात, अशी स्पर्धा या कामचुकार मंत्र्यांनी का भरवली'

मुंबई, 03 जून: ग्रामीण भाग कोरोनामुक्त व्हावा म्हणून राज्य सरकारने स्पर्धेचं (Village corona free competitions) आयोजन केले आहे. मात्र, या स्पर्धेवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी टीका केली आहे. पवारांनी ‘येडं पेरलं अन खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची  झाली असून ‘सगळं गावच  करील तर सरकार काय करील? असा खोचक सवाल पडळकर यांनी उपस्थितीत केला आहे.

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोरोनाची तिसऱ्या लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनामुक्त स्पर्धेचं आयोजन केले आहे. या स्पर्धेवर पडळकर यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोविड आणि लॅाकडाऊनमुळे पुर्णपणे मोडला आहे.  घरातील कित्येक कर्ते माणसं मृत्यूमुखी पडलीत. यांचे अश्रू पुसण्याऐवजी  ग्रामीण जनतेच्या दुखाची थट्टा करणारी स्पर्धा भरवली जात आहे, अशी टीका पडळकर यांनी केली.

फॅन्सनी विचारला धोनीबद्दल प्रश्न, डेव्हिड मिलरचे उत्तर वाचून वाटेल अभिमान

'जर सगळं गावच करणार असेल तर सरकार काय  करणार आहे? तुम्ही जबाबदारी दुसऱ्यावर सोपवून काय काम करणार आहात, अशी स्पर्धा या कामचुकार मंत्र्यांनी का भरवली आहे. नेहमी प्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्द्शाने ही कोरोनामुक्तीची स्पर्धा योजना केली आहे, अशी टीकाही पडळकरांनी केली.

तसंच, 'या योजनेच्या व्यवस्थापणेचा सर्व 22 निकषांमध्ये या वसुली सरकारला शुन्य गुण आहेत आणि हे २२ निकष ठरवताना कुठेही या पथकांना व व्यवस्थापणेसाठी ‘निधी’ कोण देणार? ही बाब सोयीस्करपणे अंधारात ठेवली आहे', असा आरोपही पडळकरांनी केला.

काय सांगता! चीन पुन्हा ठरु शकतो विषाणूजन्य रोगांचा हॉटस्पॉट

'खरंतर या 50 लाखांच्या बक्षीसांबद्दलही मला साशंकता आहे. कारण ज्या पत्रकारांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, त्यांना जीआर काढून पन्नास लाखांची मदत करतो सांगणाऱ्यांनी एक रूपायचीही मदत तर केलीच नाही पण कुटुंबियांना साधी भेटही दिली नाही. ही स्पर्धा म्हणजे अशाच यांच्या’भूलथापांच्या मालिकेचा’ एक भाग आहे', अशी टीकाही पडळकरांनी केली.

First published: