मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'बारामती पवारांचा बालेकिल्ला नाही तर.., 2024 साली त्यांचं विसर्जन'; गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य

'बारामती पवारांचा बालेकिल्ला नाही तर.., 2024 साली त्यांचं विसर्जन'; गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य

पडळकर म्हणाले, की निर्मला सीतारामन या बिन टाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल हे पवारांना कळणारही नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 06 सप्टेंबर : गोपीचंद पडळकर यांनी भाजपच्या बारामती दौऱ्याबद्दल बोलताना पवारांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. आज गणपती विसर्जन आहे.. 2024 साली पवारांचे विसर्जन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत आले आहेत, असं पडळकर म्हणाले. पडळकर म्हणाले, की निर्मला सीतारामन या बिन टाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल हे पवारांना कळणारही नाही.

'बारामतीचा पुढचा खासदार सेना-भाजप युतीचा', बावनकुळेंचं काटेवाडीतून थेट सुळेंना चॅलेंज

एखाद्याला फसवून लुबाडून घेण्यात बारामतीकारांना फार आंनद असतो. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा सुप्रिया सुळे या वरमाईसारख्या फिरत होत्या. श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे पवारांना आता पळून जावं लागणार आहे. मराठा आरक्षण यांना देता आलं नाही. ओबीसी आरक्षण फडणवीस सत्तेत आलं की परत मिळवलं, असंही पडळकर म्हणाले.

पवारांनी आता विश्रांती घ्यावी, त्यांना विश्रांतीची गरज -

बारामती ही पवारांची टेकडी आहे. हा बालेकिल्ला नाही. मी 2 वर्ष झाला बघतो आहे. यांचं राजकारण हे पोलिसांवर चालतं. पीआयने इथला बोर्ड सांगायची काय गरज होती. माझ्यावर खूप केसेस आहेत. केसेस म्हणजे अंगावरील दागिना समजा, असं पडळकर म्हणाले.

अजित पवारांनी बंड केलं 2/3 आमदार मागे राहिले नाहीत. शिंदे 50 आमदार घेऊन गेले. फडणवीस यांना सत्तेत बसू द्यायचं नव्हतं. मात्र तरीदेखील फडणवीस सत्तेत आले, याचंच पवारांना दुःख आहे.. यांच्या काळात शेतकऱ्यांची वीज तोडली गेली. जेव्हा बावनकुळे ऊर्जामंत्री होते तेव्हा एकाही शेतकऱ्याची वीज तोडली नाही, असा दावा त्यांनी केला.

पुढे ते म्हणाले, की भाजपमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा नेहमीच सन्मान होतो. 2019 साली बावनकुळे यांना तिकीट दिले नाही. आता 288 मतदारसंघाचे तिकीट वाटपाचे काम त्यांना दिले आहे.

First published:

Tags: Gopichand padalkar, Sharad Pawar