मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'काका-पुतण्यांना मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही कारण.'.; पडळकरांचा पवारांवर आरोप

'काका-पुतण्यांना मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही कारण.'.; पडळकरांचा पवारांवर आरोप

ते म्हणाले, की काका पुतण्याचं हे दुखः आहे की मुळात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही घराणेशाहीला संधी दिली नाही.

तुषार रूपनवर, प्रतिनिधी सांगली 30 जुलै : मराठा समाजाला पूर्वलक्ष्यी प्रभावाने ews चा लाभ देण्याचा ठाकरे - पवार सरकारमधील निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्याच वेळेस सांगत होतो की कायद्यामध्ये पूर्वलक्ष्यी प्रभावाने काही देता येत नाही. आता पुन्हा एकदा सिद्ध झाले की काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. 'राज्यपालांनी नाही त्या विषयात नाक खुपसण्याची गरज नाही', मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुनावलं ते म्हणाले, की काका पुतण्याचं हे दुखः आहे की मुळात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही घराणेशाहीला संधी दिली नाही. त्यांनी एका साध्या मराठा कुटुंबातील एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली. म्हणून काका-पुतणे यांच्या पोटात कळा उठत आहेत आणि म्हणूनच ते आता इकडे तिकडे बोंबा मारत फिरत आहेत. पडळकर पुढे म्हणाले की गरीब मराठा समाजाचं भलं करण्यापेक्षा यांना आपल्याच पै पाव्हण्यांचं भलं करायचं आहे. हीच यांची खरी वृत्ती बाकी सगळ्या आपुलकीच्या भूलथापा आहेत, असा आरोपही पडळकरांनी यावेळी बोलताना केला. 'भाषणाचा आशय हा राष्ट्रप्रेमाशी निगडीत', राम कदमांनी केली राज्यपालांची पाठराखण राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे मागील सरकारच्या काळात मराठा समाजाच्या तरूणांना SEBC प्रवर्गातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय झालेला. मात्र शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात हा निर्णय रद्द करण्यात आला. त्यामुळे यापुढे मराठा समाजातील तरुणांना EWS आरक्षणाचा लाभ मिळू शकणार नाही. याच मुद्द्यावरुन पडळकर यांनी पवारांवर टीका केली.
First published:

Tags: Ajit pawar, Gopichand padalkar, Sharad Pawar (Politician)

पुढील बातम्या