भाजपची नवी खेळी, पवारांविरोधात वापरणार 2014 चा 'लोकसभा पॅटर्न'

अजित पवार यांची कोंडी करण्यासाठी भाजपने आता नवा डाव टाकला आहे.

Akshay Shitole | News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 09:56 AM IST

भाजपची नवी खेळी, पवारांविरोधात वापरणार 2014 चा 'लोकसभा पॅटर्न'

मुंबई, 30 सप्टेंबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत पवार विरुद्ध फडणवीस असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेत ईडीचं संकट परतावून लावल्याने राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह संचारला. पण त्यानंतर बारामतीत अजित पवार यांची कोंडी करण्यासाठी भाजपने आता नवा डाव टाकला आहे.

वंचित बहुजन आघाडीतून राजीनामा दिलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर भाजपकडून अजित पवार यांच्याविरोधात बारामतीतून लढण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर आज दुपारी 12 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचं निश्चित झालं आहे.

पवारांविरोधात भाजप वापरणार 2014 चा 'लोकसभा पॅटर्न'

भाजपकडून थेट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात रासपचे नेते महादेव जानकर यांना मैदानात उतरवून राज्यभर वातावरण निर्मिती केली होती. धनगर समाजाचे नेते असलेले जानकर तेव्हा विजयापासून दूर राहिले असले तरी त्यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज दिली होती.

यंदाच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांची निवड केली आहे. गोपीचंद पडळकर हेदेखील धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच भाजप त्यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. पवारांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून धनगर समाजातील नेत्यांना समोर आणण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते या परिसरातील जातीय समीकरण. बारामती मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाची मतं आहेत. त्यामुळे धनगर समाजातील मतदारांना चुचकारण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.

Loading...

विधानसभेसाठी भाजप पहिली यादी आज येणार, उमेदवारांची नावं निश्चित!

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात झाली. जवळपास साडेचार तास चाललेल्या बैठकीमध्ये विधानसभा उमेदवारांच्या नावावरती अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जवळपास एक तास बैठक झाली. त्यानंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचीदेखील जवळपास एक तास बैठक झाली. साडेसहा तासाच्या मंथनानंतर भाजपची पहिली यादी आज येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यावेळी विधानसभा रणांगणात उतरणार आहेत तर शिवसेना-भाजप युतीवरदेखील अंतिम निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीमध्ये युतीच्या फार्म्युल्यावरदेखील निर्णय घेण्यात आला असून शिवसेनाला 124 जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.

साताऱ्यातील उमेदवारीबाबत पृथ्वीराज चव्हाण घेणार दोन दिवसांत निर्णय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 09:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...