• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • फडणवीसांवरील टीकेमुळे पडळकर भडकले, संजय राऊतांवर एकेरी शब्दांत विखारी टीका

फडणवीसांवरील टीकेमुळे पडळकर भडकले, संजय राऊतांवर एकेरी शब्दांत विखारी टीका

'संजय राऊत हे शिवसेनेचं खातात आणि जागतात पवारांना. मुळात संजय राऊत यांनीच राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडणं लावली'

  • Share this:
सांगली, 27 जून: ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून आता भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. या वादात आता भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतTयांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत विखारी टीका केली आहे. तसंच, राज (Raj Thackery) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्या विकोपाला राऊतच जबाबदार आहे, असा गंभीर आरोपही केला. गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आणि धनगर आरक्षणाच्या मुद्यावर एक व्हिडीओ प्रसिद्ध करून संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी आरक्षणावरून राजकारण न करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या टीकेला पडळकरांनी उत्तर दिले आहे.

पावसाळ्यात साखर, मिठाला सुटलं पाणी; या टीप्स फॉलो करा बिलकुल खराब होणार नाही

'संजय राऊत हे शिवसेनेचं खातात आणि जागतात पवारांना. संजय राऊत यांच्या सारख्या नेत्याची धनगर समाजाला आवश्यकता नाही. मुळात संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडणं लावली.  भावा-भावाच्या विरोधात भांडण लावून दस्तलेखक म्हणून भावाचा राजीनामा तयार केला तो यांनीच केला, असा गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी केली. तसंच, आता शरद पवार यांच्या सांगण्यावरून आजच्या सामनाच्या रोखठोक सदरात पुण्याचे बिल्डर अविनाश भोसले हे किती अजित पवारांच्या जवळचे आहेत हे सांगतील. एकाप्रकारे त्यांनी काकांच्या सांगण्यावरून पुतण्याच्या मागे फटाके लावायचे काम केले आहे, अशी टीकाही पडळकरांनी केली.

कशाला हवा आयड्रॉप; घरगुती उपायांनी काही मिनिटांत थकलेल्या डोळ्यांना करा फ्रेश

'मुळात जे आदिवासींना ते धनगरांना’ यानुसार फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील धनगरांसाठीच्या योजनेला 1000 कोटी मंजूर केले होते. पण, यातला एकही रुपया ठाकरे सरकारने दिला नाही, असा आरोपही पडळकरांनी केला. ओबीसी आरक्षणाकरता फडणवीस सरकारने 23 जीआर काढले होते. याबद्दल संजय राऊत यांना काहीच माहिती नाही. त्याची अमंलबजावणी तर सोडा मुळात दिलेला निधीही परत घेतला, अशी टीकाही पडळकरांनी केली.
Published by:sachin Salve
First published: