VIDEO: पंढरपुरात गावगुंडांकडून शेतमजुराचा संसार उद्ध्वस्त; राहतं घर पाडल्यानं रस्त्यावर काढावी लागली रात्र
VIDEO: पंढरपुरात गावगुंडांकडून शेतमजुराचा संसार उद्ध्वस्त; राहतं घर पाडल्यानं रस्त्यावर काढावी लागली रात्र
Crime in Solapur: सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील काही गावगुंडानी शेजमजुराला शेत जमिनीतून हाकलून लावण्यासाठी त्यांचं घर पाडलं (goons demolished farm labor's house ) आहे.
पंढरपूर, 17 जानेवारी: सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील ओझेवाडी याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील काही गावगुंडानी शेजमजुराला शेत जमिनीतून हाकलून लावण्यासाठी त्यांचं घर पाडलं (goons demolished farm labor's house ) आहे. आरोपींनी गरीब शेतमजुराचा संसार उद्ध्वस्त करत त्यांना उघड्यावर आणलं आहे. पीडित कुटुंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता, पोलिसांनी देखील तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या कुटुंबाला संपूर्ण रात्र उघड्यावर काढावी लागली आहे.
मिळेलेल्या माहितीनुसार, संजय क्षिरसागर असं संबंधित शेतमजुराचं नाव आहे. ते पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी येथील रहिवासी आहेत. ओझेवाडी गावात त्यांची एक एकर शेत जमीन होती. संजय यांनी आपली एक एकर शेत जमीन आपल्या अज्ञान मुलाच्या नावावर केली होती. पण मुलगा सज्ञान झाल्यानंतर त्याने वडिलांच्या परस्पर ही जमीन गावातील एका व्यक्तीला विकली आहे. याच शेतात संजय यांनी पंतप्रधान आवास योजनेतून कुटुंबासाठी घर बांधलं होतं.
पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी याठिकाणी काही गाव गुंडांनी एका शेतमजुराचं घर पाडलं आहे. pic.twitter.com/7oj16D10k1
हेही वाचा-विरार हादरलं! संपत्तीच्या वादातून भावाचे बहिणीवर कोयत्याने वार,घटनेचा LIVE VIDEO
पण संबंधित शेत जमीन मुलानं विकल्याने गावातील काही गावगुंडानी संजय क्षिरसागर यांच्या घरी येऊन त्यांचा संसार उद्ध्वस्त केला आहे. क्षिरसागर कुटुंबीयांना शेत जमिनीतून हाकलून लावण्यासाठी त्यांनी पंतप्रधान आवास योजनेतून बांधलेलं क्षिरसागर यांचं घर आणि शौचालय पाडून टाकलं आहे. गावगुंड घर पाडत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी याठिकाणी काही गाव गुंडांनी एका शेतमजुराचं घर पाडलं आहे. pic.twitter.com/4f5P1fW7tC
मुलाच्या कृत्यामुळे बेघर झालेल्या संजय क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबानं संपूर्ण रात्र पंढरपुरातील रस्त्यावर उघड्यावर काढावी लागली आहे. याप्रकरणी संजय क्षिरसागर यांनी पोलिसांत फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना दमदाटी करत हाकलून लावलं आहे. पोलिसांनी घर पाडणाऱ्या गाव गुंडांवर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतमजूर संजय क्षिरसागर यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.