लवकरच चांगले घडेल, फडणवीसांना शुभेच्छा देत उदयनराजेंनी दिले नव्या राजकारणाचे संकेत, VIDEO

लवकरच चांगले घडेल, फडणवीसांना शुभेच्छा देत उदयनराजेंनी दिले नव्या राजकारणाचे संकेत, VIDEO

'विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या होत्या. पण, राजकारणामुळे त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले आहे'

  • Share this:

सातारा, 22 ऑक्टोबर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत दाखल होणार आहे. खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणाचे चित्र पालटण्याची चिन्ह आहे. त्यातच राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत, 'लवकरच चांगले घडेल', असे सूचक विधान केले आहे.

उदयनराजे भोसले हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहे.  साताऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजे भोसले यांनी आपल्या स्टाईलमध्ये महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

'राज्याची सूत्र ताब्यात घेऊन एक चांगल्या प्रकारचं शासन महाराष्ट्रात लागू करण्याकरिता देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना शुभेच्छा देतो, असं म्हणत उदयनराजे यांनी आगामी काळात राजकीय भूकंप घडणार असल्याचे संकेत दिले आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या होत्या. पण, राजकारणामुळे त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले आहे. सरकार कुणाचे पण असू द्या, पण स्थिरता असेल तरच शासन करू शकतो, असंही उदयनराजे म्हणाले.

'महाराष्ट्राच्या जनतेला स्थिर सरकार हवे आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, लवकरच काही तरी चांगले घडेल आणि लोकांची जी काही प्रश्न आहे, ती सुटणार आहे, असं सूचक विधानही उदयनराजेंनी केलं.

त्याचबरोबर, 'काही लोकं ही आपल्या स्वार्थासाठी एकत्र आली आहे.  स्वार्थासाठी जी लोकं एकत्र येतात तेव्हा निर्णय होत नाही. स्वार्थ पूर्ण झाला की लोकं वेगळे होतात, असा टोलाही उदयनराजे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

Published by: sachin Salve
First published: October 22, 2020, 11:53 AM IST
Tags:

ताज्या बातम्या