तब्बल दीड महिन्यानंतर आली सुखद बातमी! मालेगावात 617 पैकी 428 कोरोना रुग्ण झाले बरे

तब्बल दीड महिन्यानंतर आली सुखद बातमी! मालेगावात 617 पैकी 428 कोरोना रुग्ण झाले बरे

कोरोनाचा हॉटस्पॉट अशी नवी ओळख मिळालेल्या मालेगावातून तब्बल दीड महिन्यांनी सुखद बातमी आली आहे.

  • Share this:

मालेगाव, 17 मे: कोरोनाचा हॉटस्पॉट अशी नवी ओळख मिळालेल्या मालेगावातून तब्बल दीड महिन्यांनी सुखद बातमी आली आहे. शहरात 617 पैकी तब्बल 428 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच उर्वरित रुग्ण देखील बरे होण्याच्या मार्गावर आहेत. कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मालेगावची रिकव्हरी टक्केवारी 71.11 इतकी आहे. विशेष म्हणजे ही टक्केवारी राज्यातच नव्हे तर देशात अव्वल मानली जात आहे.

हेही वाचा...कोरोनाचा धोका वाढला! देशात 24 तासांत 4000 नवे रुग्ण, रुग्णसंख्या 90 हजारांवर पोहोचली

झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत असणाऱ्या मालेगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे मालेगावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनानेही समाधान व्यक्त केले आहे.

अशी आहे नाशिक जिल्ह्याची स्थिती..

- जिल्ह्यात कोरोना बाधीत आकडा 784

- 24 तासात नवे 41 रुग्ण

- जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 36

- यात मालेगाव 34 तर नाशिक शहरात 2

- ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढला

- मालेगाव हॉटस्पॉट कायम

- मालेगाव 610 पॉझिटिव्ह

- जिल्ह्यातील नाशिक,मालेगावसह सिन्नर ,चांदवड ,येवला ,सटाणा , दिंडोरी, निफाड या 8 तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव.

दुसरीकडे मात्र, देशात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 तासांत 4 हजार 987 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत देशभरात कोरोनाचा आकडा 90 हजार 927 वर पोहोचला आहे. त्यापैकी 53, 946 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत 34, 109 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मत दिली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा.. मुलीकडे अचानक मोबाइल आला कसा? वडिलांनी जाब विचारताच जेवणात कालवलं विष!

कोरोना व्हायरसमुळे देशभरात आतापर्यंत 2 हजार 872 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व सामान्य नागरिकांपासून ते सैन्य दलापर्यंत कोरोना व्हायरसचा धोका आता सगळीकडे जाणवत असल्यानं प्रशासनाकडून वारंवार काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. आतापर्यंतची ही 24 तासांतील सर्वात मोठी वाढ असल्याची चर्चा आहे. 24 तासांत 4 हजार 900 हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 30 हजार 706 झाली आहे. आज 1606 नविन रुग्णांचे निदान झाले असून आज 524 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 7088 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 22 हजार 479 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 61 हजार 783 नमुन्यांपैकी 2 लाख 31 हजार 071 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 30 हजार 706 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3 लाख 34 हजार 558 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17 हजार 48 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First published: May 17, 2020, 11:49 AM IST

ताज्या बातम्या