मनमाड, 25 जून: मुंबईत कोरोनाचा उद्रेक वाढत असताना नाशिक जिल्ह्यातून दिलासादायक वृत्त समोर आलं आहे. मनमाड हे शहर कोरोनामुक्त झालं आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शेवट्या दोन्ही रुग्णांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थित डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता मनमाड शहरात एकही कोरोनाबाधित रुग्ण उरला नाही.
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 51 होती. या सर्वांनी टप्प्या-टप्प्याने कोरोनावर मात केल्यामुळे आल्यानंतर शहरात एक ही कोरोनाबाधित रुग्ण उरला नाही. शहर कोरोनामुक्त झाल्याचे कळताच नागरिकांनी मोठा दिलासा मिळाल्यानं त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.
हेही वाचा...कोरोनावरील उपचारासाठीचं औषध आणि नवी चाचणी, आरोग्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
शहर कोरोनामुक्त झाले असले तरी धोका मात्र टळला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता नियमांचे पालन केल्यास पुन्हा शहरात कोरोनाची एन्ट्री होणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी व्यक्त केला.
भारतासह संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला असून मनमाड पासून जवळ असलेले मालेगाव, येवला, लासलगाव, चांदवड या चार ही शहरात कोरोनाने शिरकाव केला होता. मात्र मनमाड शहर कोरोनामुक्त होते. परंतु 2 मे रोजी शहरात कोरोनाची एन्ट्री झाली होती. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णात वाढ होत गेली आणि बाधित रुग्णांची संख्या 51 वर पोहोचली होती. रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून पालिका प्रशासन, पोलीस अधिकारी, कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी, आरोग्य विभाग या सर्वांनी वेगवेगळ्या उपाययोजना करून आपापली जबाबदारी पार पाडली.
हेही वाचा...लॉकडाऊनमध्ये दिवस-रात्रं खेळत होता Pubg, नंतर उचललं टोकाचं पाऊल
जनता, लोक प्रतिनिधी, यांची पुरेपूर साथ मिळाली. त्यामुळे सुदैवाने शहरात कोरोनाचा जास्त फैलाव झाला नाही. उलट टप्प्याने, टप्प्याने रुग्णांनी कोरोनावर मात केली. शेवटचे 2 रुग्ण उरले होते त्यांनी देखील कोरोनाचा पराभव केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी या रुग्णांना पुष्पगुच्छ देवून रुग्णांना निरोप दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.