#गुडन्यूज : मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाने जोडणार, 325 किमी अंतर होणार कमी !

#गुडन्यूज : मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाने जोडणार, 325 किमी अंतर होणार कमी !

लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत या रेल्वेमार्गाच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे, येत्या 4 वर्षात या रेल्वेमार्गाचं काम पूर्ण होईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : गेल्या 40 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाच्या निविदा अखेर जाहीर झाल्याय. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत या रेल्वेमार्गाच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे, येत्या 4 वर्षात या रेल्वेमार्गाचं काम पूर्ण होईल. इंदूर-मुंबई रेल्वेमार्गामुळं या दोन महानगरातील अंतर हे 325 किलोमीटरने कमी होणार  आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातल्या अनेक मागास जिल्ह्यांना विकासाची दारं खुली होतील अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीये. पोर्टने रेल्वेमार्ग बांधण्याचा देशातील हा पहिला प्रकल्प ठरणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

या प्रकल्पाचा श्रीगणेशा बुधवारी झाला. प्रकल्पात समाविष्ट असलेल्या रेल्वे मार्गातील 4 रेल्वे पुलांच्या कामांची पहिली निविदा बुधवारी जाहीर झाली. उत्तर महाराष्ट्रातल्या लाखो नागरीकांची स्वप्नपूर्ती केल्याबद्दल केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी गडकरींचा सत्कार केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना गडकरींनी डॉ. सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्यामुळं हा रेल्वेमार्ग होणार असल्याचे कौतुकोद्गार काढले.

यावेळी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. पोर्ट रेल कनेक्शन कार्पोरेशनकडून होणारा हा देशातला पहिला रेल्वे प्रकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासाठी सुमारे 9 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. मनमाड-मालेगाव-धुळे-नरडाणा- पुढे इंदूरपर्यंतचा 362 किलोमीटरच्या या रेल्वेमार्गावर एकूण 595 लहान मोठे पुल आणि काही बोगदे असतील. या मार्गांवर 120 किलोमीटर प्रति तास वेगानं रेल्वे धावेल. इंदूर-मुंबई रेल्वेमार्गामुळं या दोन महानगरातील अंतर 325 किलोमीटरने कमी होणार असून, त्यामुळं 47 हजार कंटेनर माल मुंबईला रस्ते ऐवजी रेल्वेनं पाठवणे शक्य होईल.

या सर्व बाबींमुळे वेळ, श्रम आणि पैशांची बचत होणार आहे. वाहनामुळे निर्माण होणारे प्रदुषण, वाहतुकीची कोंडी कमी होणार असल्याचं गडकरी म्हणाले. या प्रकल्पामुळे 50 हजार रोजगाराची निर्मिती होणार असून, निर्यात, शेती आणि लहानमोठे उद्योग, व्यवसायांना चालना मिळणार आहे. या रेल्वेमार्गासाठी 2 हजार हेक्टर जमीन हस्तांतरीत करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा..

VIDEO : काँग्रेसच्या चिन्हासमोरचं बटन दाबलं भाजपला मतदान,निवडणूक अधिकारी म्हणतात...

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, भाजपला हटवणं हेच टार्गेट - ममता बॅनर्जी

VIDEO : दोन वाहनांच्या धडकेत 'तो' मध्येच सापडला

 

First published: August 1, 2018, 10:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading