Home /News /maharashtra /

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, या 2 ठिकाणी सुरू आहे भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, या 2 ठिकाणी सुरू आहे भरती

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कोरोना काळातील नकारात्मक स्थितीत रोजगाराची छोटीशी संधीही बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक ठरते.

    मुंबई, 5 डिसेंबर : कोरोना नावाचं संकट जगाच्या कानाकोपऱ्यात धडकलं आणि विविध समस्यांचा जन्म झाला. आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली अन् देशांची आर्थिक स्थितीतही खालावू लागली. परिणाम बेरोजगारीचं मोठं संकट निर्माण झालं आहे. भारतातील तरुणाईलाही याची झळ पोहोचली आहे. अशा नकारात्मक स्थितीत रोजगाराची छोटीशी संधीही बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक ठरते. कुठे आहे नोकरीची संधी? भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध 368 पदांची भरती मॅनेजर (फायर सर्व्हिसेस) – 11 जागा मॅनेजर (टेक्निकल) – 2 जागा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल) – 264 जागा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअरपोर्ट ऑपरेशन्स) – 83 जागा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (टेक्निकल) – 8 जागा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 15 डिसेंबर 2020 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 14 जानेवारी 2021 पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती पदाचे नाव – जतन सहायक, छायाचित्रचालक, माळी, पहारेकरी, रोजंदारी पहारेकरी एकूण पद संख्या– 5 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2020 सायंकाळी 5.45 पर्यंत अर्ज सादर करण्याचा पत्ता : पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन, सेंट जॉर्जेस किल्ला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ, मुंबई 400001. परीक्षा वेळापत्रकाच्या तपशीलासाठी -www.maharashtra.gov.in
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Unemployment

    पुढील बातम्या