गुड मॉर्निंग पथकानं 9 महिन्यांच्या गर्भवतीला जबरदस्तीनं टाकलं गाडीत

गुड मॉर्निंग पथकानं 9 महिन्यांच्या गर्भवतीला जबरदस्तीनं टाकलं गाडीत

वाशिम जिल्ह्यातल्या मेडशीमध्ये 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेला हागणदारीमुक्त मोहीम पथकानं, ज्याला गुडमॉर्निंग पथक असंही नाव दिलंय, जबरदस्तीनं गाडीत टाकून नेलं,तर सोलापूर जिल्ह्यात उघड्यावर शौच करत होती म्हणून एका महिलेचा भर रस्त्यात सत्कार करण्यात आला.

  • Share this:

08 आॅक्टोबर : राज्यात सध्या हागणदारी मुक्त मोहीम सुरूय.पण यात आता अतिरेक होण्याची उदाहरणं समोर येतायत. वाशिम जिल्ह्यातल्या मेडशीमध्ये 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेला हागणदारीमुक्त मोहीम पथकानं, ज्याला गुडमॉर्निंग पथक असंही नाव दिलंय, जबरदस्तीनं गाडीत टाकून नेलं,तर सोलापूर जिल्ह्यात उघड्यावर शौच करत होती म्हणून एका महिलेचा भर रस्त्यात सत्कार करण्यात आला.

वर त्या स्त्रियांचे फोटोही काढण्यात आले. या सगळ्याची गरजच काय असा प्रश्न निर्माण होतो आणि वाशिमच्या त्या महिलेला त्रासही सुरू झाला. सुदैवानं त्या महिलेला किंवा बाळाला काही झालं नाही.पण अतिउत्साहात असलेल्या या पथकांना समज देण्याची गरज निर्माण झालीय.

First published: October 8, 2017, 1:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading