मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /चांगल्या कमाईची संधी! या 3 पक्षांमुळे होणार फायदा, वाचा सविस्तर

चांगल्या कमाईची संधी! या 3 पक्षांमुळे होणार फायदा, वाचा सविस्तर

बदकांची अंडी आणि मांस या दोन्हीमध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असल्याचे आढळून येते.

बदकांची अंडी आणि मांस या दोन्हीमध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असल्याचे आढळून येते.

बदकांची अंडी आणि मांस या दोन्हीमध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असल्याचे आढळून येते.

  • Local18
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 17 मार्च : शेतीसोबत अनेकांची जोडधंदा करायची इच्छा असते. अनेक जण ट्रॅक्टर, रोटावेटर घेऊन इतरांच्या शेतात मशागतीची कामे करतात. तर काही जण गाई म्हशी, पक्षीपालन करून त्यातून उत्पन्नाचा स्त्रोत शोधतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला आणखी एक जोडधंद्याबाबत माहिती देणार आहोत. तुम्ही जर कुकुटपालन, बदकांची शेती आणि तीतर शेती जर केली तर तुम्ही अल्पावधीतच चांगले पैसे कमवू शकतात. हॅलो कृषी डॉट कॉमने याबाबतची माहिती दिली आहे.

तीतर शेती - 

तुम्हाला जर तीतरची शेती करायची असेल तर त्यासाठी आधी सरकारकडून परवाना घ्यावा लागेल. मादी तितराची वर्षभरात 300 अंडी घालण्याची क्षमता असते. तर बहुतेक तितर त्यांच्या जन्माच्या 40 ते 50 दिवसांत अंडी घालू लागतात. त्याचा व्यवसाय फार कमी वेळात सुरू करता येतो. त्यामुळे तीतर शेतकऱ्याला चांगला नफा मिळवून देतो. या पक्ष्यांचा आकार लहान आणि वजन कमी असल्याने अन्न व जागेची गरजही कमी असते. केवळ 4-5 तीतरांचे संगोपन करून त्याचा व्यवसाय सुरू करता येतो. तसेच तीतर व्यवसायातील गुंतवणूकही खूपच कमी असते.

कुकुटपालन -

सध्या गावरान कोंबडा-कोंबडी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावरान अंडी मिळणेही शहरात मुश्किल आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जर गावरान कोंबड्यांचे पालन केले आणि त्याला योग्य व्यावसायिक दिशा दिली तर नक्कीच यातून चांगली कमाई करता येऊ शकते. मात्र, कुकुटपालन करताना आपल्या कोंबड्या कोणत्याही रोगाला बळी पडणार नाहीत याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

कुक्कुटपालनासाठी तुम्ही विविध बँकांकडून कर्ज देखील मिळवू शकता. पोल्ट्री फार्मसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडूनही कर्ज घेता येते. यासाठी तुम्हाला मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड आणि इतर अनेक कागदपत्रांची आवश्यकता आहे.

Onion Subsidy : सरकारी अनुदान म्हणजे थट्टा, शेतकऱ्यानं समजावलं कांद्याचं गणित, पाहा Video

बदकांची शेती -

बदकांची अंडी आणि मांस या दोन्हीमध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असल्याचे आढळून येते. बाजारपेठेतही त्याची मागणी वाढत आहे. मागणीसोबतच त्याचे भावही वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होत आहे. बदक पालन सुरू करण्यासाठी शांत जागा उत्तम मानली जाते. तलावाच्या सभोवतालची जागा यासाठी अतिशय योग्य असल्याचे समजले जाते. परंतु बदक शेतीसाठी मोठा तलाव सायलाच हवा असे नाही. आजकाल अनेक शेतकरी शेततळ्यावरही बदक पळून चांगले पैसे कमावत आहेत.

बदक पालनाचे फायदे माहितीयेत का?

बदकामध्ये रोग प्रतिकार शक्ती जास्त असते त्यामुळे रोगराईचं प्रमाण कमी असतं. बदक कळपात राहत असल्याने त्यांची संरक्षण मॅनेजमेंट सोयीची असते. 100% बदकं रात्री ते सकाळी 9 पर्यंत अंडी घालतात. त्यामुळे सर्वच्या सर्व अंडी पदरात पडतात. बदके चरायला सोडल्यानंतर स्वतःचे अन्न स्वतः शोधतात. चरणं झाल्यानंतर रात्री मूळ जागेवर येण्याची त्यांना तंतोतंतपणे सवय लावता येते. दलदलीच्या रेताड पाणथळ जागेवर बदकपालन करता येते. देखभालीवराचा खर्च कमी. अंडी मोठी असून पौष्टिक असतात.

बदकाची वैशिष्ट्ये काय?

एका गावातून दुसऱ्या गावात जिथे जाण्याची उपलब्धता असते तिथे जातात. रात्रीच्या वेळी बदके शेतात एका ठिकाणी ठेवतात आणि सकाळी अंडी गोळा करतात. शिवाय रात्रभर शेतात बसवल्याबद्दल (मूत्र खत यांच्या मोबदल्यात) शेतकऱ्यांकडून पैसेही घेतात. बदकं कोंबड्यांपेक्षा जास्त काटक असतात. कोंबड्यांपेक्षा वाढही जलद होते. अंडी मोठी असून ते देण्याचं प्रमाणही जास्त असते. खाद्यावरचा खर्च कोंबडीच्या तुलनेत निम्माच असतो. बदकाच्या घर व्यवस्थापनासाठी जास्त खर्च येत नाही. कोंबडीच्या तुलनेत बदकांची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. बदके रात्रीच्या वेळी अंडी देतात. शक्यतो 100% बदके रात्री ते सकाळी 9 वाजेपर्यंत अंडी घालतात आणि त्यानंतर त्यांना चरायला सोडता येते.

First published:
top videos

    Tags: Farmer, Local18, Maharashtra News