मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Gondiya Rain : रस्ता ओलांडताना माजी सैनिकासह वाहून गेली टाटा सुमो, 10 तास शोध मोहीम

Gondiya Rain : रस्ता ओलांडताना माजी सैनिकासह वाहून गेली टाटा सुमो, 10 तास शोध मोहीम

गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या किडनगिपार ते शिवणी नाल्यावर रस्ता ओलांडताना टाटा सुमो वाहून गेली.

गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या किडनगिपार ते शिवणी नाल्यावर रस्ता ओलांडताना टाटा सुमो वाहून गेली.

गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या किडनगिपार ते शिवणी नाल्यावर रस्ता ओलांडताना टाटा सुमो वाहून गेली.

  • Published by:  Sandeep Shirguppe

गोंदिया,11 ऑगस्ट : गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या किडनगिपार ते शिवणी नाल्यावर रस्ता ओलांडताना टाटा सुमो वाहून गेली. गाडीत बसलेल्या तीन लोकांपैकी दोघे बचावले परंतु एक वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. वाहून गेलेल्या मध्ये 40 वर्षीय माजी सैनिक मोहन शेंडे यांचा समावेश आहे. (Gondiya rain)

मोहन शेंडे हे पदमपूर येथे राहतात ते रात्रीच्या सुमारास पुलावरून जाताना हा प्रकार घडला आहे. नाल्यावर कमी पाणी असल्याने टाटा सुमो चालकाने पाण्यावरून गाडी नेताना अंदाज न आल्याने ही घटना घडली. नाल्याला कठडे नसल्याने गाडी वाहून गेल्याची माहिती देण्यात आली.

हे ही वाचा : Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस थांबला पण महापुराची भिती कायम, नागरिकांचे स्थलांतर

दरम्यान पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून मागील १० तासा पासून शोध मोहीम सुरु आहे. तर आज सकाळी वाहून गेलेली गाडी बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र गाडीसोबत वाहून गेलेले माजी सैनिक मोहन शेंडे यांचा शोध अद्यापही सुरु आहे.

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

गेले तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे नागपुरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही विद्यापीठाने कळविले आहे. तसेच शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. हवामान खात्याने आज व उद्या रेड अलर्ट चा इशारा दिला आहे.

संपूर्ण विदर्भ जलमय

मागच्या 24 तासांत विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असून गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्यामध्ये अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस कोसळू शकतो. तसेच बुलडाणा, वाशीम जिल्ह्याच्याही अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील ज्या तालुक्यांना अतिवृष्टीचा धोका आहे.

हे ही वाचा : Maharashtra Rain : राज्यात आज येलो अलर्ट पण पुणे, मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

त्यामध्ये प्रामुख्याने चामोर्शी, गडचिरोली, वडसा, कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, गोंदिया, तिरोडा, आमगाव, गोरेगाव, भंडारा, तुमसर, लाखणी, लाखांदुर, मुल, सावली, लाखणी, लाखांदुर, नागपूर रामटेक, पारशिवणी, मौदा, ऊमरेड, सावनेर, नरखेड, कामठी, पाचगाव, धामणा, कुही, भिवापूर, वरुड, मोर्शी, चांदुरबाजार, अचलपूर, धारणी, चिखलदरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, दर्यापूर, अकोट, तेल्हारा, बाळापूर, अकोला, मूर्तिजापूर, जळगाव जामोद, शेगाव, मेहकर, कारंजा, मंगरुळपीर, नेरपरसोपंत, बाभुळगाव, यवतमाळ या तालुक्यांचा समावेश आहे.

First published:

Tags: Accident, Bhandara Gondiya, Rain fall, Rain flood

पुढील बातम्या