मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

फडणवीस 'देवमाणूस' पण... आधी अमित शाह आता भाजपच पोस्टरवरून गायब!

फडणवीस 'देवमाणूस' पण... आधी अमित शाह आता भाजपच पोस्टरवरून गायब!

गोंदियात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शुभेच्छाचे लावण्यात आलेल्या बॅनरवरून एकटे अमित शाहच (Amit Shah) नव्हे तर कमळासह पूर्ण भाजपच (BJP) गायब करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस यांचा देवमाणूस म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
गोंदिया, 8 जुलै : गोंदियात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शुभेच्छाचे लावण्यात आलेल्या बॅनरवरून एकटे अमित शाहच (Amit Shah) नव्हे तर कमळासह पूर्ण भाजपच (BJP) गायब करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस यांचा देवमाणूस म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. हे बॅनर फडणवीस यांचे खंदे समर्थक विधान परीषद सदस्य परीणय फुके (Parniya Fuke) यांनी गोंदिया शहरात जागो-जागी लावले आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. त्यामुळे मुख्यमंत्री तेच होणार नाही अशी चर्चा असताना ऐनवेळी फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले होते. ही नाराजी आज पुन्हा एकदा गोंदियात पाहायला मिळाली आहे. भाजपचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लागल्यानंतर राज्यात काही ठिकाणी भाजपच्या पोस्टरवर अमित शाह यांचा फोटो दिसला नाही. अमित शाह यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी शाह यांचा फोटो पोस्टरवर लावला नसल्याचं बोललं जाऊ लागलं. या सगळ्या प्रकरणावर भाजप नेत्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. भाजपच्या प्रोटोकॉलमुळे अमित शाह यांचा फोटो लावला नसल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आली. राज्यात सत्तानाट्य एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे 40 आणि अपक्ष अशा 50 आमदारांसह बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील, हे निश्चित मानलं जात होतं. पण महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्वीस्ट आला. देवेंद्र फडणवीस यांनीच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील याची घोषणा केली. ही घोषणा करतानाच फडणवीस आपण सत्तेत सहभागी होणार नसल्याचं सांगितलं, पण यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली.
First published:

Tags: Amit Shah, BJP, Devendra Fadnavis

पुढील बातम्या