नक्षलग्रस्त भागात पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ

देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सी 60 पथकामध्ये ओमप्रकाश रहिले काम करत होता.

देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सी 60 पथकामध्ये ओमप्रकाश रहिले काम करत होता.

  • Share this:
    गोंदिया, 15 मार्च : गोंदिया जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव ओमप्रकाश रहिले असे असून तो अर्जुनी-मोरगाव येथील रहिवासी होता. देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सी 60 पथकामध्ये ओमप्रकाश रहिले काम करत होता. ओमप्रकाश 2011 साली पोलीस म्हणून भर्ती झाला होता. देवरी येथील भाड्याच्या घरी राहत असून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 14 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. गोंदियाच्या नक्षलग्रस्त असलेल्या सी 60 पथकातमध्ये काम करणाऱ्या ओमप्रकाशने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र पोलीस विभागात या पोलीस जवानाने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत. हेही वाचा- विवाहितेचं पिझ्झा डिलिव्हरी बॉयशी जुळलं सूत, पिता-पुत्रानं असा काढला काटा दिवसातील दुसरी घटना एकीकडे पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येची घटना समोर आली असताना दुसरीकडे पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची घटना परभणीमध्ये घडली आहे. शहरातील खानापूर फाटा परिसरात राहणाऱ्या 30 ते 35 वर्षीय युवकाने त्याच्या पत्नीची हत्या केली. तसंच त्यानंतर स्वतःचीही जीवनयात्रा संपवली आहे. या दाम्पत्याला एक ते दीड वर्षाचा मुलगा असून घडलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
    First published: