तरुणांवर काळाचा घाला; बस-दुचाकीच्या भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

तरुणांवर काळाचा घाला; बस-दुचाकीच्या भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

जखमीवर गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Share this:

प्रवीण तांडेकर, गोंदिया, 4 ऑक्टोबर : गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया-गोरेगाव मार्गावर भीषण अपघात झाला आहे. हिरडामाली गावाजवळ दुचाकीवर आणि बसची जोरदार धडक झाली असून या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर एक गंभीर जखमी आहे. जखमीवर गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतक हे आपल्या दुचाकीने गोरेगावच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. त्यानंतर बसच्या चाकाखाली येऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. संदिप परसराम शेंदरे (वय - 22 वर्ष), दिलीप राधेलाल न्यायमूर्ती (वय - 26 वर्ष) यांनी आपला जीव गमावला आहे. तर शिवम महेश्वर उईके (वय - 22 वर्ष) हा जखमी झाला आहे.

सर्व अपघातग्रस्त तरूण कोहळीटोला येथील रहिवाशी आहेत. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे.

या तरुणांच्या मृत्यूनंतर परिसरावर शोककळा पसरली असून मृतकांच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला.

दरम्यान, कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले होते. मात्र अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आणि रस्त्यांवर पुन्हा भरधाव वेगाने वाहने धावू लागली. परिणामी रस्ते अपघाताचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे चालकांनी वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 4, 2020, 8:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading