मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /हृदयद्रावक! डोळ्यादेखत पतीसह 2 मुलांचा मृत्यू, महिलेचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

हृदयद्रावक! डोळ्यादेखत पतीसह 2 मुलांचा मृत्यू, महिलेचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

Gondia Accident

Gondia Accident

ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ३ मुलांसह एका पुरुषाचा मृत्यू झाला. यात दोन सख्ख्या भावंडांचा समावेश आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

रवी सपाटे, गोंदिया, 01 एप्रिल : गोंदियात ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ मुलांसह एका पुरुषाचा मृत्यू झाला. यात दोन सख्ख्या भावंडांचा समावेश आहे. गोंदियातील रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या ठाकनी भागवत टोला रस्त्यावर हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी महिलेचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ठाकनी भागवत टोला रस्त्यावर ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. यात तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रूग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आदित्य बिसेन (७ वर्ष), मोहित बीसेन (११ वर्ष), कुमेंद्र बिसेन (३७ वर्ष) सगळे रा. दासगाव आणि आर्वी कमलेश तूरकर ५ वर्ष मुलगी रा. चुटिया यांचा समावेश आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

जे केलं ते योग्यच! गोडसे नसते तर भारताचा नाश झाला असता, कालीचरण महाराज पुन्हा बडबडले 

गोंदिया येथील पिंकेपार इथे लग्न सोहळ्याकरिता बिसेन कुटुंबीय दास गावावरून आले होते. लग्न सोहळा संपल्यानंतर दासगाव येथे परत आपल्या मोटरसायकलने जात होते. तेव्हा ठाकनी भागवत टोला या रस्त्यावर ट्रकने दुचाकीला धडक दिली.ही धडक इतकी जोरदार होती की दोन मुलांचा व ३७ वर्षी बिसेन यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. याची माहिती रामनगर पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. ट्रक चालकाविरुद्ध रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Accident