गोंदियातील 6 वर्षाच्या चिमुरडीनं केलं 5 लहानग्यांना अवयवनदान!

गोंदियातील 6 वर्षाच्या चिमुरडीनं केलं 5 लहानग्यांना अवयवनदान!

रेव्यानीच्या पालकांनी आपलं दु:ख विसरत तिच्याच वयाच्या चिमुकल्यांना जीवनदान दिलं. त्यामुळे रेव्यानी मृत्यूनंतरही अवयवांच्या रुपाने या जगात असेल.

  • Share this:

दिपेंद्र गोस्वामी, 30 एप्रिल : आपल्या 6 वर्षीय मुलीचा अपघातात ब्रेन डेड झाल्यानंतर अवयवदान करून मुलीच्या मृत्यूचं दुःख बाजूला सारत इतर 5 चिमुकल्यांना जीवनदान देणाऱ्या गोंदियाच्या राहगडाले कुटूंबीयांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलाय.

६ वर्षांची चिमुकली रेव्यानी राहगडाले. रेव्यानीने केजी 2 ची परीक्षा दिल्यानंतर तिला सुट्टी लागली. सुट्टीत मामासोबत देवरीवरून गोंदियाच्या दिशेने बाईकवरुन जात असताना त्यांचा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेली रेव्यानी आठ दिवस उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. अखेर डॉक्टरांनी ती ब्रेन डेड झाल्याचं घोषित केलं. पण अशात आपल्या अंगणातली कळी अकाली खुडली गेल्याचं दुःख बाजुला ठेवत रेव्यानीच्या पालकांनी तिचे अवयव दान करण्याचा मोठा निर्णय घेतला.

तर रेव्यानी ही बालपणापासूनच शिक्षणात खूप हुशार असल्याचे तिचे शिक्षक सांगतात. रेव्यानीच केजी 2 वर्गाचा निकाल आला असून तिला ए श्रेणीमध्ये गुण मिळाले आहेत.

दरम्यान, रेव्यानीचं हृदय मुंबईतल्या दोन वर्षांच्या मुलीला देण्यात आलं, तर किडनी चेन्नईच्या एका चिमुरडीला दान करण्यात आली. तिचं यकृत आणि डोळे नागपुरातील लहानग्यांना दान करण्यात आले. रेव्यानीच्या कुटुंबाला हा निर्णय भावनांच्या पलिकडे जाऊन जनजागृती करण्यासारखा आहे.

रेव्यानीच्या पालकांनी आपलं दु:ख विसरत तिच्याच वयाच्या चिमुकल्यांना जीवनदान दिलं. त्यामुळे रेव्यानी मृत्यूनंतरही अवयवांच्या रुपाने या जगात असेल.

 

First published: April 30, 2018, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading