Home /News /maharashtra /

Gondia ZP Election 2022 : राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का, गंगाधर परशुरामकर पराभूत

Gondia ZP Election 2022 : राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का, गंगाधर परशुरामकर पराभूत

गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला आहे. कारण राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांचा पराभव झाला आहे.

    गोंदिया, 19 जानेवारी : गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला आहे. कारण राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांचा पराभव झाला आहे. डव्वा जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे गंगाधर परशुरामकर पराभूत झाले आहेत. तर भाजपचे बी एम पटले हे विजयी झाले आहेत. गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत आतापर्यंत भाजपचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच जिल्हा परिषद सदस्य तर काँग्रेसचे तीन सदस्य विजयी झाले आहेत. गंगाधर परशुरामकर हे प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात. दोन महिन्यांपूर्वी गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी काही कारणास्तव जिल्हाध्यक्ष पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बातचित केली होती. अखेर प्रफुल्ल पटेल यांच्या सुचनेनुसार जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते गंगाधर परशुरामकर यांच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. (केंद्रीय मंत्री भारती पवार यांना दिराचा धक्का, भाजपला धोबीपछाड, राष्ट्रीवादीचा दणका) खरंतर ही निवडणूक प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी खूप प्रतिष्ठेची मानली जात होती. कारण भाजपकडून प्रचंड ताकद लावली जात होती. त्यामुळे प्रफुल्ल पटेल हे देखील आपल्याबाजून निवडणूक जिंकण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसले होते. पण अखेर गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचाच पराभव झाला आहे. त्यामुळे हा प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. गोंदिया जिल्हा परिषद निकाल भाजप – 15 १) तिरोडा अर्जुनी- चतुरभूज बिसेन, २) सोनी - पंकज रहांगडाले ३) सेजगाव- पवन पटले ४)कीकरीपार- किशोर मारवाडे ५) पुराडा - सविता पुराम ६)धापेवाडा - विजय ऊके ७) डव्वा - बी. एम. पटले ८) गोटाबॉडी - कल्पना वलोद ९) कामठ - रीतेशकुमार बलगाम १०) सौंदड - निशा तोडासे ११) कुरहाडी पाथरी - शैलेंद्र नंदेश्वर १२) पंढराबोडी - शांताबाई देशभ्रतार १३) सरांडी - रंजनी कुंभारे १४) चिखली - कविता रंगारी १५) नवेगांवबांध - रचना गहाने शिवसेना – 0 राष्ट्रवादी –5 १) बीरसोला - नेहा तुरकर २) घाटटेंमनी - सुरेश हरसे ३) सुकळी - जगदीश बावंथडे ४) पाढरी - रहांगडाले ५) कवलेवाडा - किरन पारधी काँग्रेस– 8 १) शाहरवानी- जितेन्द्र कटरे २) झालीया - छाया नागपुरे ३) पिपरिया - गीता लिल्हारे ४) गोरठा - छबु ताई ऊके ५) तिरखेड़ी - विमल कटरे ६)भरेगावं- संदीप भाटिया ७) अंजोरा - उषा मेंढे ८) ककोंडी - उषा शहारे इतर – चाबी संघटन 3 (अपक्ष संघटन) १) काटी- आनंदा वाडीवा चाबी २) पांजरा - वैशाली पंधते चाबी ३) नागर - सोनु कुथे टोपली गोंदिया जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 1) देवरी नगर पंचायत 17 जागा भाजप – 09 (सत्ता स्थापन करणार ) राष्ट्रवादी –01 काँग्रेस –02 2) मोरगाव अर्जुनी नगर पंचायत 17 जागा भाजप – 05 शिवसेना –00 राष्ट्रवादी –01 काँग्रेस –04 इतर –01 3) सडक अर्जुनी नगर पंचायत 17 जागा (महाविकास आघाडी विजयी, राष्ट्रवादीचा कब्जा) भाजप – 01 शिवसेना –01 राष्ट्रवादी –07 काँग्रेस –02 बाहुबली पेनल- 03 इतर –03
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या