रवी सपाटे (गोंदिया), 02 डिसेंबर : गोंदिया जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर धान कापणी झाल्यानंतर धानाची मळणी करण्याचे काम जोमात सुरू आहे. धान मळणी करिता शेतकरी थ्रेसर मशीनचा वापर करीत असून भाड्याच्या रूपाने या मशीनचा उपयोग शेतकरी करीत असतात. मात्र थ्रेशर मशीनवर धानाचे बोझे टाकत असताना अचानक थ्रेशरमध्ये सापडल्याने शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील देऊटोला शेतशिवारात घडली. दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेने सगळ्याचा धक्का बसला आहे. यामुळे देऊटोलामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर धान कापणी सुरू आहे. यासाठी कापणी झाल्यानंतर धानाची मळणी करण्याचे काम केले जाते. यामुळे धान मळणी करिता शेतकरी थ्रेसर मशीनचा वापर मोठ्य प्रमाणात केला जातो.
हे ही वाचा : पुणे तिथे काय उणे! टोमॅटोप्रमाणे चक्क झाडाच्या फांदीला लगडले बटाटे, पाहण्यासाठी मोठी गर्दी
शेतकरी भाड्याच्या रूपाने या मशीनचा उपयोग करत असतात. मात्र थ्रेशर मशीनवर धानाचे बोझे टाकत असताना अचानक थ्रेशरमध्ये सापडल्याने शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील देऊटोला शेतशिवारात घडली.
हे ही वाचा : 2 कोटींचा विम्याचा दावा मिळावा म्हणून पत्नी अन् मेव्हण्याची हत्या, म्हणे हा अपघात...
मृतक हा मशीनमध्ये धानाचे बोझे टाकत असताना अचानक तो मशीनमध्ये ओढून दबल्या गेल्याने त्याचा अक्षरशः त्याचा शरीराचा चेंदा मेंदा होऊन मशीन मध्ये त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतकाचे नाव गुड्डू पटले असे असून तो मु. सोनी ता. गोरेगाव येथील रहिवाशी होता. सदर घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhandara Gondiya, Death, Farmer